*वावडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सुरू असलेल्या कामाची मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी भेट देऊन पाहणी केली*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वावडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सुरू असलेल्या कामाची मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी भेट देऊन पाहणी केली*
*वावडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सुरू असलेल्या कामाची मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी भेट देऊन पाहणी केली*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नवापूर तालुक्यातील ग्राम पंचायत वावडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी करणे कामी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी भेट देऊन ग्राम पंचायत वावडी यांनी केलेल्या कामाची प्रत्यक्ष केली असून शाळा, अंगणवाडी, नरेगा भवन, खेळाचे मैदान, वाचनालय, ग्राम पंचायत कार्यालय, गार्डन, पाहणी केली तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी, डिजिटल कार्यक्रम अंतर्गत प्रात्यक्षिक करून दाखविले, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी व महिला बचत सदस्यांनी लेझीम पथक व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले, सरपंच ग्राम पंचायत अधिकारी सर्व ग्राम पंचायत सदस्य माजी सरपंच यांनी केलेल्या कामाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक केले, तसेच यापुढे देखील असेच काम करावे अशा शुभेच्छा दिल्यात. या सोबत गट विकास अधिकारी देविदास देवरे, विस्तार अधिकारी ग्राम पंचायत, शिक्षण, तसेच पंचायत समिती चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच ग्रामस्थांमध्ये उस्फुर्त प्रतिसाद दिसून आला यावेळी ग्रामस्थ महिला भगिनी पुरुष मंडळी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.