*रावल बी.एड. कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात स्वयंसेवकांचे उत्स्फूर्त श्रमदान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रावल बी.एड. कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात स्वयंसेवकांचे उत्स्फूर्त श्रमदान*
*रावल बी.एड. कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात स्वयंसेवकांचे उत्स्फूर्त श्रमदान*
दोंडाईचा(प्रतिनिधी):-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे, श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. कॉलेज दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने, दादासाहेब रावल हायस्कूल मालपूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात स्वयंसेवकांनी स्पूर्तपणे श्रमदान केले. दिवसाची सुरुवात एनएसएस लक्ष्यगीत व ईशस्तवनाने झाली. त्याचे सूत्रसंचालन गणेश पारखे याने केले. त्यानंतर एन. एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एम. एस. उभाळे यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रीय पद्धतीने ओमकार साधनेचा सराव करून घेतला. स्वयंसेवकांनी वृक्षारोपणासाठी खड्ड्यांचे खोदकाम केले. सौरभ कोळी व त्यांच्या सहकार्यानी व्यसनमुक्ती या विषयावर प्रासंगिक नाट्याचे सादरीकरण केले. त्यावेळी हायस्कूल व प्राथमिक शाळेतील अनेक विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर मालपूर धरणाजवळील डोंगर उतारावर ठिबक सिंचन पद्धतीने सुरेश पाटोळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वृक्षांना दिले जाणाऱ्या पाण्याच्या ड्रीप दुरुस्तीचे काम स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने केले. यावेळी सुरेश पाटोळे यांनी वृक्ष लावण्याच्या संकल्पनेमागील प्रेरणा स्पष्ट केली. कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. एस. उभाळे यांनी सुरेश पाटोळे यांनी स्वयंसेवकांना ड्रीप दुरुस्ती श्रमदान करण्याची संधी दिली याबद्दल आभार अभिव्यक्ती केली. दुपारच्या भोजनानंतर तिसऱ्या सत्रात ॲड. चेतन पाटील यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा या अंतर्गत असलेले विविध कलमे सोप्या भाषेत स्वयंसेवकांना समजावून दिले. त्यावर आधारित स्वयंसेवकांच्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. प्रा. सतीष अहिरे यांनी राष्ट्रनिर्माणात युवकांची भूमिका प्रभावीपणे स्पष्ट केली. यावेळी एन. एस.एस.च्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.निशा ठाकूर यांनी दोन्ही मान्यवरांची आभार अभिव्यक्ती केली. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रिंट मीडिया वार्ताहर अडगाळे यांचे स्वागत प्रा. एम. एस. उभाळे यांनी केले.कार्यक्रमाच्या नियोजनाचे मार्गदर्शन प्राचार्य पी.डी.बोरसे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.एम.एस.उभाळे, प्रा.रवींद्र पाटील, प्रा.निशा ठाकूर, प्रा. रेवती बागुल, प्रा. सुनीता वळवी व प्रा.आर.एस.वळवी यांनी प्रयत्न केले. तर प्रशासकीय सेवक शंकर गिरासे, कृष्णा बागुल,अमर राजपूत व वीरपाल गिरासे सहकार्य केले.



