*नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन पुणे संघटनेत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांची नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन पुणे संघटनेत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांची नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी निवड*
*नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन पुणे संघटनेत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांची नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, पुणे या राज्यस्तरीय संघटनेचा महाराष्ट्रभर विस्तार करण्यात आला असून, या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ही निवड अधिकृतपणे जाहीर केली. नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन ही औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक, फार्मासिस्ट व औषध व्यावसायिक यांना एकत्र आणणारी विद्यार्थी -केंद्रित व कल्याणकारी संघटना आहे. गेल्या दोन वर्षांत संघटनेने फार्मसी क्षेत्रासाठी अनेक अभिनव उपक्रम राबविले असून, मेगा जॉब फेअरसारख्या उपक्रमाची दखल महाराष्ट्र शासनानेही घेतली आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. सचिन कोतवाल व उपाध्यक्ष डॉ. अमोल शहा यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर संघटनेचा विस्तार करण्यात येत असून, फार्मसी क्षेत्रातील विविध प्रश्नांवर एकत्रितपणे काम करणारी ही संघटना म्हणून नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन उदयास आली आहे. डॉ. पंकज चौधरी यांचा फार्मसी क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, संघटनात्मक कार्यातील सहभाग तसेच औषध व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबतची सकारात्मक व प्रभावी भूमिका लक्षात घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे नंदुरबार जिल्ह्यातील फार्मासिस्ट व औषध विक्रेत्यांच्या समस्या अधिक प्रभावीपणे मांडल्या जातील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनची स्थापना 10 मे 2024 रोजी करण्यात आली असून, ही संस्था फार्मसी क्षेत्राच्या प्रगतीसाठी व कल्याणासाठी समर्पित आहे. फार्मसी समुदायाला बळकटी देणे, व्यावसायिक मानके उंचावणे तसेच शिक्षण व व्यवहार क्षेत्रात उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे, हा संघटनेचा मुख्य उद्देश आहे.
डॉ. पंकज एम. चौधरी हे महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे समन्वयक असून, तसेच वेगवेगळ्या पदाचे नामनिर्देशित सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.
या निवडीबद्दल नंदुरबार जिल्ह्यातील फार्मासिस्ट बांधवांकडून डॉ. पंकज चौधरी यांचे अभिनंदन करण्यात येत असून, संघटनेच्या माध्यमातून फार्मसी व्यवसायाच्या विकासासाठी व व्यावसायिकांच्या हितरक्षणासाठी कार्य करण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला आहे.



