*जीटी पाटील महाविद्यालयात ई कचरा संकलन केंद्राचे उद्घाटन संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जीटी पाटील महाविद्यालयात ई कचरा संकलन केंद्राचे उद्घाटन संपन्न*
*जीटी पाटील महाविद्यालयात ई कचरा संकलन केंद्राचे उद्घाटन संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी टी पाटील महाविद्यालय तील राष्ट्रीय छात्र सेना एकक व कनिष्ठ वरिष्ठ राष्ट्रीय सेवा योजना एकक व एन डी डी सी नंदुरबार व संपूर्णम फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ई-कचरा संकलन केंद्र व जनजागृती उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा डॉ एम जे रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. टाकाऊ पासून टिकाऊ बनवण्याची प्रवृत्ती जोपासत ही कचरा संकलन केंद्र नंदुरबार शहरात विविध ठिकाणी उभारण्यात आले त्यात आपल्या घरात असणारा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा खराब साठा याची संकलन संकलन करून त्याचे रिसायकलिंग द्वारे नवीन वस्तूत रूपांतर करण्याचा मानस एनडीडीसी नंदुरबार व संपूर्णम फाउंडेशन पुणे यांनी घेतला आहे पर्यावरण भिमुख वातावरण राहावे व अविघटनशील वस्तू पर्यावरणासाठी घातक असतात याचे भान ठेवून समाज जनजागृती सुद्धा यातून करण्यात येत आहे . या उपक्रमातून शाळा महाविद्यालय तीन विद्यार्थी पालक यांना आपल्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब वायर्स या केंद्रात संकलित करण्याचे आव्हान करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी एनडीडीसी नंदुरबारचे समन्वयक आशिष वाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य रघुवंशी यांनी उपस्थितांना ही कचरा संकलन करण्यासाठी आवाहन केले तसेच असे समाजभिमुख उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहित केले. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे समन्वयक डॉ एम एस रघुवंशी उपप्राचार्य डॉ एस पी पाटील अंतर्गत गुणवत्ता विभागाचे समन्वयक डॉ एम आर पाटील, प्रा अंकुश रघुवंशी उपस्थित होते. कार्यक्रमात एकूण 150 छात्र सैनिक व स्वयंसेवक यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे आयोजन छात्रसेना अधिकारी लेफ्ट डॉ विजय चौधरी कार्यक्रमाधिकारी डॉ सुलतान पवार व डॉ मनोज शेवाळे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा राजश्री बाविस्कर व प्रा हर्षबोध बैसाने यांनी परिश्रम घेतले.



