*व्हॉईस ऑफ मीडियातर्फे पत्रकारपाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*व्हॉईस ऑफ मीडियातर्फे पत्रकारपाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप*
*व्हॉईस ऑफ मीडियातर्फे पत्रकारपाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील व्हॉईस ऑफ मीडियातर्फे पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आले. शहरातील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला तोरणमाळ येथील गोरक्षनाथ मठाचे पिठाधीश संजूनाथ महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील होते. व्यासपीठावर नवनिर्वाचित नगरसेवक तथा पालिकेचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, व्हाईस ऑफ मीडियाचे सरचिटणीस राकेश कलाल, साप्ताहिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बडगुजर, पत्रकार महादू हिरणवाळे, राजू पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना संजुनाथ महाराज म्हणाले की, समाजमनाचे दर्पण असलेल्या पत्रकार बांधवांच्या पाल्यांनी यशस्वी होण्याचे कार्य केले आहे. त्यांचा उचित सन्मान होणे गरजेचे आहे. अतिदुर्गम भागात जाण्यासाठी रस्ते नाही. त्यामुळे तेथील आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. यासाठी पत्रकारांनी पाठपुरावा करावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच तोरणमाळ आणि नर्मदा नदी येथे कॉरिडॉर प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. नगरसेवक हिरालाल चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील यांनी केले. त्यात त्यांनी व्हॉईस ऑफ मीडियामार्फत पत्रकारांसाठी राबविल्या जाणार्या कल्याणकारी उपक्रमांची माहिती दिली. यानंतर पत्रकारपाल्यांना शैक्षणिक किट वाटप करण्यात आली. दप्तर, वह्या, कंपास, पेन बॉक्स, वॉटर बॅग, पॅड, टिफीन आदी साहित्य या किटमध्ये समाविष्ट होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महादू हिरणवाळे यांनी केले. कार्यक्रमास नंदुरबार, तळोदा, शहादा, अक्कलकुवा येथील पत्रकार आणि त्यांचे पाल्य उपस्थित होते. व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष वैभव करवंदकर यांनी आभार मानले.



