*राजापूर तालुक्यात भाजपातून बंडखोरीची पहिली ठिणगी रायपाटणच्या माजी सरपंचांचा पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूर तालुक्यात भाजपातून बंडखोरीची पहिली ठिणगी रायपाटणच्या माजी सरपंचांचा पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल*
*राजापूर तालुक्यात भाजपातून बंडखोरीची पहिली ठिणगी रायपाटणच्या माजी सरपंचांचा पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील पूर्व विभागात रायपाटण ग्रामपंचायत भाजपकडे आहे. तसेच रायपाटण प.स. गणात सौंदळ व अन्य ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा भाजपचे प्राबल्य आहे. श्री. संदीप कोलते हे उच्च शिक्षित उमेदवार असून दहा वर्षे रायपाटण ग्रामपंचायतीचे सरपंच होते. संदीप कोलते भाजप कार्यकर्ते असून पक्षीय राजकारणा व्यतिरिक्त त्यांचा सर्वसामान्य जनतेत उत्तम जनसंपर्क आहे. संदीप कोलते जिजामाता विद्यामंदिर रायपाटण येथे लिपिक असून स्वच्छ चारित्र्य असल्याची प्रतिमा जनतेमध्ये आहे आणि प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव असून जानेतेचे प्रश्न सोडविण्याचे उत्तम कौशल्य आहे, भाजपकडून अधिकृत उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाजपला सदर जागा मिळण्याची शक्यता नसल्याने कोलते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपची तालुक्यात ताकद वाढवायची असेल तर प. स. व जि. प. मध्ये लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळालीच पाहिजे, असं मत त्यांनी मांडल आहे. दोन दिवसापूर्वी त्यांनी खासदार आदरणीय नारायण राणे यांची कणकवली निवासस्थानी राजापूर तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेऊन सर्व परिस्थिती सांगितली आहे.
संदीप कोलते यांनी पंचायत समिती निवडणूक लढवत असल्याने संपूर्ण रायपाटणसहीत प. स. गणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यासोबत प्रचारासाठी सर्वसामान्य कार्यकर्ते मोठ्या ताकदीने उतरणार असल्याचे त्यांनी नमूद केलं आहे.



