*शेंबवणे (ओझरवाडी) येथे भव्य अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शेंबवणे (ओझरवाडी) येथे भव्य अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धा*
*शेंबवणे (ओझरवाडी) येथे भव्य अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धा*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील साईनाथ मित्र मंडळ, शेंबवणे (ओझरवाडी) यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही रविवार दि. 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वा. श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे दु. 1 ते 3 महाप्रसाद, सायं 3 ते 5 सांस्कृतिक कार्यक्रम शाळा नं 1 व 2 मधील तसेच वाडीतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व क्रिडा कौशल्य गुणगौरव पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे रात्री 9 वा. गावातील व वाडीतील भजनांचा कार्यक्रम होईल
सोमवार दि.26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त स. 9.30 वाजता साई स्टेडियम शेंबवणे ओझरवाडी पोस्ट पांगरे येथे गाव मर्यादित भव्य अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दुपारी 12 वा. साईनाथ महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. क्रिकेट स्पर्धा व कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी नरेश जुवळे - ९३२५४५०७३६, निलेश बाणे - ७४४७८५०६३५, बाबु बाणे - ८९९९२४२६५८, रुपेश आग्रे - ८८८८०३५९०१, प्रमोद आग्रे - ९२२६२३८१७९, हेमंत जुवळे - ९३२१८८४८२३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन साईनाथ मित्र मंडळ शेंबवणे यांनी केले आहे.



