*तामथरे येथे साकारणाऱ्या भव्य ‘श्री राधाकृष्ण प्रेम मंदिरा’साठी भक्तीमय दिशा 24 जानेवारीला शिरपुर येथे महत्त्वपूर्ण बैठक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तामथरे येथे साकारणाऱ्या भव्य ‘श्री राधाकृष्ण प्रेम मंदिरा’साठी भक्तीमय दिशा 24 जानेवारीला शिरपुर येथे महत्त्वपूर्ण बैठक*
*तामथरे येथे साकारणाऱ्या भव्य ‘श्री राधाकृष्ण प्रेम मंदिरा’साठी भक्तीमय दिशा 24 जानेवारीला शिरपुर येथे महत्त्वपूर्ण बैठक*
शिरपूर(प्रतिनिधी):-तामथरे ता. शिंदखेडा या ठिकाणी राज्यातील भक्ती, प्रेम व आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक ठरणाऱ्या भगवान श्री राधाकृष्ण प्रेम मंदिराच्या भव्य व दिव्य मंदिर उभारणीचे काम चालू आहे.
त्याअनुषंगाने शिरपूर येथे दि.24 जानेवारी 2026 (शनिवार) रोजी सायंकाळी 4 वाजता मंदिर बांधकाम कमिटी व तालुक्यातील तमाम भगवान श्रीकृष्णांच्या भाविक भक्तांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक स्व. इंद्रसिंग भाऊसाहेब हॉल, वरझडी रोड, शिरपूर येथे पार पडणार आहे.
ही बैठक श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थान, तामथरे (ता. शिंदखेडा, जि. धुळे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आली असून, परमपूज्य संत महेंद्रजी महाराज यांच्या पावन अध्यक्षतेखाली तसेच उद्योजक रवि सुरत (गुजरात) यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न होणार आहे. शिरपूर तालुक्यासह परिसरातील तमाम भाविक भक्त, माता -भगिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच युवा मित्र मंडळ यांना या बैठकीस उपस्थित राहण्याचे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे.
भगवान श्री राधाकृष्ण यांच्या प्रेम, भक्ती व अध्यात्माने ओतप्रोत असे मंदिर साकारताना भाविकांचे मार्गदर्शन, सहभाग व सहकार्य अत्यंत मोलाचे असून, या दैवी कार्यात समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीत मंदिर उभारणी संदर्भातील पुढील टप्पे, नियोजन व भाविकांच्या सूचनांवर सविस्तर चर्चा होणार असल्याचेही सांगण्यात आले.
या पवित्र उपक्रमात शिरपूर शहर व ग्रामीण भागातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री राधाकृष्ण प्रेम मंदिराच्या उभारणीसाठी आपला मोलाचा वाटा उचलावा, असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे.



