*राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार, मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार, मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम*
*राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार, मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन समारंभ सोमवार 26 जानेवारी 2026 रोजी साजरा करण्यात येणार असून, ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी 9.15 वाजता पोलीस मुख्यालय, नवीन पोलिस कवायत मैदान, नंदुरबार येथे राज्यमंत्री गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन योगेश ज्योती रामदास कदम यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिली आहे. भारतीय 77 वा प्रजासत्ताक दिन समारंभाचा मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम 26 जानेवारी 2026 रोजी राज्यभर एकाचवेळी सकाळी 9.15 वाजता करण्यात येणार असल्याने या दिवशी सकाळी 8.30 ते 10.00 च्या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 च्या पुर्वी किंवा 10 वाजेनंतर करावा. पोलीस मुख्यालय येथील ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभास स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नी व आई- वडील, शौर्य पुरस्कार विजेते, स्थानिक राजकीय पक्षांचे प्रमुख, आणीबाणीच्या कालावधीत कारावास भोगलेल्या व्यक्ती, शासकीय अधिकारी आणि नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.



