*आरोग्यपूर्ण जीवनासाठी भारतीय आहार सर्वोत्तम-डॉक्टर पूजा बागुल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आरोग्यपूर्ण जीवनासाठी भारतीय आहार सर्वोत्तम-डॉक्टर पूजा बागुल*
*आरोग्यपूर्ण जीवनासाठी भारतीय आहार सर्वोत्तम-डॉक्टर पूजा बागुल*
दोंडाईचा(प्रतिनिधी):-"भारतीय आहार पद्धती ही आयुर्वेदावर आधारलेली आहे. आहार हेच औषध या पायावर ती आधारलेली आहे. योग्य संतुलित व ऋतूनुसार घेतलेला आहार हा शरीर व मन निरोगी ठेवतो. भारतीय आहारामुळे पचन सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते. भारतीय आहार संतुलित आहे, नैसर्गिक व स्थानिक पदार्थांवर आधारित आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात, स्वच्छते घेतलेला आहार मानसिक समाधान देणारा आहे. त्यामुळे आरोग्यपूर्ण जीवनासाठी भारतीय आहार सर्वोत्तम आहे."असे डॉ. पूजा बागुल यांनी राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिरात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना वैचारिक प्रबोधन सत्रात आहार व आरोग्य या विषयावर संबोधित करताना सांगितले. शिबिराच्या चौथ्या दिवशी सकाळी प्रार्थना घेण्यात आली. त्याचे सूत्रसंचालन चेतना दातेराव हिने केले. शिबिराचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एम. एस. उभाळे यांनी स्वयंसेवकांचे श्वसनध्यान घेतले. अल्पोपहारानंतर स्वयंसेवकांनी मालपूर मधील मंदिरांची स्वच्छता केली. यामध्ये इच्छापूर्ती गणेश मंदिर, श्रीराम मंदिर, श्री साईबाबा मंदिर, हनुमान मंदिर, जुने महादेव मंदिर, आणि दुर्गा माता मंदिर या मंदिरांचा समावेश होता. त्यामुळे स्वयंसेवकांमध्ये सेवाभाव, स्वच्छता मूल्य व अध्यात्मिक मूल्यांची जोपासना होण्यास मदत झाली. दुपारच्या भोजनानंतर सौरऊर्जेचे उपयोग या विषयावर गटचर्चा घेण्यात आली. गटचर्चेचे सूत्रसंचालन व आभार अभिव्यक्ती राजश्री राजपूत हिने केली. तर अध्यक्षीय समारोप धनश्री राजपूत हिने केला. गणेश पारखे, निकिता रावल व गायत्री सोमवंशी यांनी सौर ऊर्जे संबंधी विविध पैलूंवर समायोजित चर्चा केली. गटचर्चेसाठी प्रा. डॉ. एम. एस. उभाळे यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रातील वैचारिक प्रबोधनात प्रा.डॉ. नरेंद्र पाठक यांनी सोशल मीडिया या विषयावर प्रबोधन केले. सोशल मीडियाचा जपून वापर करण्याचे त्यांनी स्वयंसेवकांना आवाहन केले. त्याचप्रमाणे डॉ. पूजा बागुल यांनी आहार व आरोग्य या विषयावर प्रबोधन केले. आणि आहाराचा औषध म्हणून वापर केल्यास कधीही औषध घेण्याची वेळ येणार नाही हे ठामपणे सांगितले. वंदे मातरम नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. शिबीरातील कार्यक्रमांच्या नियोजनाचे मार्गदर्शन प्राचार्य पी.डी.बोरसे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.एम.एस.उभाळे, प्रा.रवींद्र पाटील, प्रा.निशा ठाकूर, प्रा. रेवती बागुल, प्रा. सुनीता वळवी व प्रा.आर.एस.वळवी यांनी प्रयत्न केले. तर प्रशासकीय सेवक शंकर गिरासे, कृष्णा बागुल, अमर राजपूत व वीरपाल गिरासे सहकार्य केले.



