*जोगणीपाडा आश्रम शाळेत राष्ट्रीय भूगोल दिवस उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जोगणीपाडा आश्रम शाळेत राष्ट्रीय भूगोल दिवस उत्साहात साजरा*
*जोगणीपाडा आश्रम शाळेत राष्ट्रीय भूगोल दिवस उत्साहात साजरा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नं.ता.वि.समिती संचलित,अनुदानित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा जोगणीपाडा येथे 14 जानेवारी 2026 निमित्ताने 'राष्ट्रीय भूगोल दिन' आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने उच्च माध्यमिक विभागाचे भूगोल शिक्षक किशोर राजेंद्र पाटील यांनी कार्यक्रमाची सुरवातीस भूगोल दिनाचे महत्त्व समजावून भूगोल विषयाची सविस्तर माहिती दिली भविष्याच्या दृष्टिकोनातुन नोकरीच्या संधी व करियर मार्गदर्शन करून भूगोल विषयाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. तसेच इयत्ता 1ली ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना डिजिटल प्रोजेक्टरच्या सहाय्याने सूर्यमाला पृथ्वीची रचना, खंड -महासागर, हवामान नैसर्गिक संसाधने प्राकृतिक व मानवी घटक पर्यावरण व नकाशा याबाबत सविस्तर व दृकश्राव्य माहिती देण्यात आली. व
इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी भूगोल विषयावरील प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजन करून स्पर्धा घेतली. प्रश्नमंजुषेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.ए. पाटील व प्रमुख पाहुणे तर प्राथ. मुख्याध्यापक जे.वाय पाटील होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राथ.माध्य. उच्च माध्यमिक शिक्षक बंधू भगिनी यांनी उपस्थित होते. सूत्रसंचालन बी. आर.शिंपी यांनी केले.



