*नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना, मुख्याधिकारी गट ‘ब’ / सहाय्यक आयुक्त संवर्गातून मुख्याधिकारी गट ‘अ’ मध्ये पदोन्नती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना, मुख्याधिकारी गट ‘ब’ / सहाय्यक आयुक्त संवर्गातून मुख्याधिकारी गट ‘अ’ मध्ये पदोन्नती*
*नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना, मुख्याधिकारी गट ‘ब’ / सहाय्यक आयुक्त संवर्गातून मुख्याधिकारी गट ‘अ’ मध्ये पदोन्नती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कर्तव्यदक्षता, प्रामाणिकपणा, दूरदृष्टी व उत्कृष्ट प्रशासनकौशल्य यांचा सुरेख संगम असलेले, सर्वांना सोबत घेऊन संघभावनेतून काम करणारे नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना मुख्याधिकारी गट ‘ब’ / सहाय्यक आयुक्त संवर्गातून मुख्याधिकारी गट ‘अ’ मध्ये पदोन्नती मिळाल्याबद्दल नंदुरबार पालिकेतील प्रशासकीय अधिकारी जयसिंग गावित, बांधकाम विभागाचे गणेश गावित तसेच दीपक पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे, निर्णयक्षमता व लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे नंदुरबार नगर परिषदेच्या प्रशासकीय कार्यास निश्चितच नवी दिशा व उंची प्राप्त झाली आहे. ही पदोन्नती त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांची, निष्ठेची व कार्यतत्परतेचीच पावती आहे. त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक उत्तम, पारदर्शक व लोकहितकारी कार्य घडो, हीच सदिच्छा व्यक्त करण्यात आली.