*नवापूर तालुक्यातील विविध विकास कामांची गटविकास अधिकारी देवरे यांच्याकडून पाहणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नवापूर तालुक्यातील विविध विकास कामांची गटविकास अधिकारी देवरे यांच्याकडून पाहणी*
*नवापूर तालुक्यातील विविध विकास कामांची गटविकास अधिकारी देवरे यांच्याकडून पाहणी*
नवापूर(प्रतिनिधी):-नवापूर तालुक्यातील ग्राम पंचायत लहान कळवण येथे नवापूर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देविदास देवरे यांनी भेट देऊन पाणी पुरवठा विहिरीची पाहणी केली, यावेळी सदर विहिरीत कचरा व पाला पाचोळा आढळून आला असून, सदर विहिरीची तत्काळ साफ सफाई करणे बाबत सूचना दिल्यात, तसेच अंगणवाडी केंद्र भेट देऊन पोषण आहाराची तपासणी करण्यात आली, तसेच गरोदर मातांना गट विकास अधिकारी देविदास देवरे यांच्या हस्ते बेबी किट वाटप करण्यात आले, त्याचप्रमाणे नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील ग्राम पंचायतीस भेट देऊन, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता गृह बांधकामांची पाहणी केली, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देऊन मार्गदर्शन केले.