*नंदुरबार येथील महेंद्रा पब्लिक स्कूलमध्ये जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार व योग साधना शिबिराचे यशस्वी आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील महेंद्रा पब्लिक स्कूलमध्ये जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार व योग साधना शिबिराचे यशस्वी आयोजन*
*नंदुरबार येथील महेंद्रा पब्लिक स्कूलमध्ये जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार व योग साधना शिबिराचे यशस्वी आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-क्रीडा व युवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व शिक्षण विभाग, नंदुरबार, क्रीडा भरती महाराष्ट्र प्रदेश तसेच महेंद्रा पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथील महेंद्रा पब्लिक स्कूलमध्ये जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार व योग साधना शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य तसेच योग व सूर्यनमस्काराचे महत्त्व रुजवणे हा होता. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार येथील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. चैताली देसाई उपस्थित होत्या. योग साधनेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी योग शिक्षक शांताराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह योगासनांचे व सूर्यनमस्काराचे धडे दिले. कार्यक्रमास शाळेच्या संचालिका पिनल शहा व प्राचार्य अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना नियमितपणे योग व सूर्यनमस्कार करण्याचे आवाहन केले. दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब केल्यास आरोग्य सुदृढ राहते, एकाग्रता वाढते तसेच सकारात्मक विचारांची जडणघडण होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. या जिल्हास्तरीय शिबिरात शाळेतील इयत्ता विविध वर्गांतील एकूण सुमारे 300 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सूर्यनमस्कार व विविध योगासने सादर केली. शिबिरादरम्यान सूर्यनमस्काराचे शारीरिक व मानसिक फायदे, तसेच आजच्या धावपळीच्या जीवनात योगाचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खगेंद्र कदमबांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका भूमिका संजोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबवावेत, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.



