*नंदुरबार येथे रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयात बहिशाल शिक्षण व्याख्यानमालेचे आयोजन"*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयात बहिशाल शिक्षण व्याख्यानमालेचे आयोजन"*
*नंदुरबार येथे रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयात बहिशाल शिक्षण व्याख्यानमालेचे आयोजन"*
नंदुरबार(प्रतिनिधी):-21 जानेवारी 2026 रोजी रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयात बहिशाल शिक्षण व्याख्यानमालेचे आयोजन" नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित श्रीमती विमलताई बट्टेसिंग रघुवंशी नर्सिंग महाविद्यालय व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने करण्यात आली. सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार येथील दामिनी पथकाच्या प्रमुख ज्योती पाटील, तसेच विशेष अतिथी म्हणून अहिंसा आयुर्वेद महाविद्यालय येथील प्रोफेसर डॉ. प्रमोद खारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक डॉ.
एम.एस. रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयाचे प्रा.भूषण ठोंबरे, विद्यार्थी कल्याण विभागाच्या समन्वयक योगिनी सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते, सदरील व्याख्यानमालेत प्रथम वर्ष बीएसए नर्सिंगचे एकूण 90 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यामध्ये जिजामाता नर्सिंग महाविद्यालय व एमकेडी नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदविला. व्याख्यानमालेत एकूण सहा सत्रांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राध्यापक भूषण ठोंबरे यांनी उपस्थित मान्यवरांची ओळख करून दिली व व्याख्यानमालेचे महत्त्व उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. प्रथम सत्रात नंदुरबार येथील सायबर क्राईम विभागाचे किरण जिरे व महाले यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात नंदुरबार पोलीस विभाग दामिनी पथकाचे पोलीस हवालदार विकास अजगे, पोलीस शिपाई प्रीती जांबिलसा व श्रीमती ज्योती पाटील यांनी महिला सुरक्षा व महिला सबलीकरण या विषयावर प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना अवगत केले. डॉ. प्रमोद खारकर यांनी आजचा युवक व व्यसनधीनता या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या दुपार सत्रात एन टीव्हीएस विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.एस. एस.हसानी यांनी अँटी रॅगिंग व कायदेशीर तत्वे या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच जी टी पी महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे डॉ. एस. यु. अहिरे यांनी विद्यार्थ्यांना तणाव्यवस्थापन व तणाव पेपर व्यवस्थापनाचे कौशल्य या विषयावर प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. व्याख्यानमालेच्या अंतिम सत्रात आरोग्य क्षेत्रातील संवाद कौशल्य या विषयावर डॉ. विजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या समारोप सत्रात सहाय्यक प्राध्यापिका अंजली तडवी यांनी कार्यक्रमाचा अहवाल सादर केला, आभार प्रदर्शन शिक्षिका रोशनी तडवी यांनी केले शिक्षक मधुर वळवी व सोनल वळवी यांनी सूत्रसंचालन केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक शंकर वसावे, ममता कोळी, वंदना वळवी, इत्यादी शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी अशोक धोबी, आकाश शिंदे, विवेक मराठे, अमोल गवळी व कल्पना चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आले.



