*जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाचे उत्कृष्ट कामकाज सुरू असल्याने सत्कार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाचे उत्कृष्ट कामकाज सुरू असल्याने सत्कार*
*जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाचे उत्कृष्ट कामकाज सुरू असल्याने सत्कार*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदूरबार येथील पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाच्या माजी अध्यक्षा कै. शालिनी जयंत नटावदकर यांच्या पुण्यस्मरणार्थ गेल्या 24 वर्षांपासून तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आयोजन करण्यात आले आहे, दिनांक 19, 20 व 21 जानेवारी या कालावधीमध्ये महोत्सव संपन्न होत आहे, दिनांक 20 जानेवारी रोजी एकलव्य विद्यालयाचे स्नेहसंमेलन आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील दामिनी पथकाच्या ज्योती पाटील यांच्या हस्ते व श्रीमती उर्मिला पारधे शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी व्यासपीठावर एकलव्य विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर, संस्थेचे समन्वयक रोहन नटावदकर, जयदीप नटावदकर, मुख्याध्यापक सुनील चौधरी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुनील खैरनार व बालमंदिरच्या मुख्याध्यापिका रंजना जोशी, कार्यक्रमाचे परीक्षक राहुल खेडकर, डॉ वैशाली शिंदे तसेच पालक प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील दामिनी पथकाचे कामकाज अत्यंत उत्कृष्ट रित्या होत असल्याने, दामिनी पथकाच्या पोलीस हवालदार ज्योती पाटील, पोलीस हवालदार विकास अजगे, पोलीस शिपाई प्रीती जाबिलसा, चालक पोलीस शिपाई गागडे यांचा स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.



