*जी.टी.पाटील महाविद्यालयात तृतीय वर्ष रसायनशास्त्र विषयाची अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी.टी.पाटील महाविद्यालयात तृतीय वर्ष रसायनशास्त्र विषयाची अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न*
*जी.टी.पाटील महाविद्यालयात तृतीय वर्ष रसायनशास्त्र विषयाची अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी टी पाटील महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व नंदुरबार तालुका विधायक समिती जी टी पाटील कॉलेज नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने नवीन शैक्षणिक धोरण (2020) नुसार तृतीय वर्ष रसायनशास्त्र अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव डॉ. एम.जे. रघुवंशी होते. त्यांनी आपल्या मनोगतात नवीन शैक्षणिक धोरण कसे आव्हानात्मक आहे याबद्दल मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेला उद्घाटक म्हणुन रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. जी एच सोनवणे उपस्थित होते. त्यांनी रसायनशास्त्र विषयाच्या प्राध्यापकांना अभ्यासक्रम पुनर्रचनेचं महत्त्व पटवून सांगितले. तसेच त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण हे रोजगाराभिमुख संकल्पनेचे गमक आहे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे समन्वयक डॉ. एम एस रघुवंशी, अक्कलकुवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. पी. सावंत, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस पी पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. पी एस पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.एम आर पाटील यांनी केले. सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. माधव कदम यांनी केले. सदर कार्यशाळेसाठी डॉ. जी आर गुप्ता, डॉ. वाय व्ही मराठे, डॉ. विजय चौधरी, डॉ. ए.एन.कुलकर्णी,डॉ.एन. पी. हुसे, व रसायनशास्त्र विषयाचे सर्व तासिका तत्त्वावरील प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यशाळेसाठी रसायनशास्त्र विषयाचे अभ्यास मंडळाचे सर्व सदस्य व नंदुरबार, धुळे व जळगाव परिसरातील रसायनशास्त्राचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते.



