*ओणी गोतावडे वाडी येथे श्री गणेश जयंती उत्सव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ओणी गोतावडे वाडी येथे श्री गणेश जयंती उत्सव*
*ओणी गोतावडे वाडी येथे श्री गणेश जयंती उत्सव*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील ओणी कोंडिवळे मधील गोतावडे वाडी येथे 22 जानेवारी 2026 रोजी श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने भव्य श्री गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सकाळी 8 वा. श्री गणेश पूजन, दु. 12 आरती,दु. 1 ते 3 महाप्रसाद, दु. 3.30 ते 5 हळदीकुंकू समारंभ, सायं 7 वा. आरती आणि रात्री 8 वा. भजन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरीही श्री गणेश भक्तांनी या कार्यक्रमाला सहकुटुंब सहपरिवार उपस्थित उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन गणेश मित्र मंडळ ओणी कोंडिवळे, गोतावडे वाडीच्या वतीने अध्यक्ष अनंत गोतावडे, उपाध्यक्ष शशिकांत गोतावडे, खजिनदार अमोल गोतावडे आणि मुंबईकर व ग्रामस्थ यांनी केले आहे.



