*सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी- रविंद्र पाटील*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी- रविंद्र पाटील*
*सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी- रविंद्र पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे दिपक तावरे यांनी जिल्ह्यातील केंद्र शासनाच्या प्राथमिक कृषी पतपुरवठा पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी नुकतीच भेट देवून पाहणी केली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक रविंद्र पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. 15 जानेवारी, 2026 रोजी नवापूर तालुक्यातील विसरवाडी आणि भरडू येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांना भेट देऊन प्रत्यक्ष संगणकीकरणाच्या कामकाजाची पाहणी केली व सचिवांना मार्गदर्शन केले. संगणकीकरणामुळे सभासदांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध होऊ शकेल, तसेच अभिलेखे स्वहस्तलिखित (manually) लिहिण्याची पद्धत बंद होऊन अपहार व गैरव्यवहार थांबतील, असे मार्गदर्शन त्यांनी केले. त्याच दिवशी संध्याकाळी, त्यांनी नंदुरबार तालुक्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामकाजाचा आढावा घेतला. 16 जानेवारी, 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यामध्ये ई- ऑफिस व ई- मोड्यूल बाबत प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी करून सूचना व मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा उपनिबंधक रविंद्र पाटील, सहाय्यक निबंधक, नवापूर तालुका जिल्हा बँकेचे शाखाधिकारी, बँक तपासनीस तसेच संध्याकाळच्या आढाव्यात विभागीय सहनिबंधक, नाशिक विभाग संभाजी निकम व संस्थेचे सचिव आदी उपस्थित होते.



