*स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे-योगेश्वर पवार
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे-योगेश्वर पवार
*स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे-योगेश्वर पवार*
दोंडाईचा(प्रतिनिधी):-"कुटुंबाची काळजी घेणारी महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. त्यांच्या आरोग्याविषयी समाजामध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. महिलांमध्ये आजारांचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी महिलांना उतार वयात आजार सुरू होत असत. परंतु आजकाल हे प्रमाण अगदी अलीकडे म्हणजे 20-25 वयावर आलेले आहे. त्यामुळे स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. समतोल आहार, आरोग्याच्या चांगल्या सवयी, योग आणि वैद्यकीय सल्ला यातून स्त्रियांचे आरोग्य सुधारणा होऊ शकते" असे मार्गदर्शन जिल्हा रुग्णालयातील समुपदेशक योगेश्वर पवार यांनी राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिरामध्ये उपस्थित विद्यार्थी स्वयंसेवकांना केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व श्रीमंत राजे दौलतसिंह रावल बी.एड. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबीर दादासाहेब रावल हायस्कूल मालपूर येथे सुरू आहे. त्यातील वैचारिक प्रबोधनात योगेश्वर पवार यांनी महिला आरोग्य या विषयावर सादरीकरण केले. शिबिरात सकाळच्या सत्रामध्ये योग, प्रार्थना, ईशस्तवन झाल्यानंतर सकाळ सत्रातील अल्पोपहारानंतर सर्व स्वयंसेवकांनी हायस्कूल परिसरातील स्वच्छता केली. विद्यार्थ्यांना त्यातूनच श्रमसंस्कार व स्वच्छता मूल्यांचे विकसित होण्यास मदत झाली. दुपारच्या भोजनानंतर सपना जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यसनमुक्ती विषयावर साधक बाधक गटचर्चा केली. त्यानंतरच्या तिसऱ्या सत्रामध्ये जिल्हा रुग्णालयातील योगेश पवार, धीरज धोंडे (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) आणि गणेश विसावे (महालॅब प्रयोगशाळा तंत्रज्ञ) यांनी विद्यार्थ्यांचा रक्तदाब मोजला, हिमोग्लोबिन, प्लेटलेट, तसेच पांढऱ्या पेशींचे गणन, सिकलसेल ॶॅनिमिया, एचआयव्ही टेस्ट अशा अनेक चाचण्यांसाठी रक्त नमुने घेतले व स्री आरोग्यासंबंधी मार्गदर्शन केले. शिबिरात एकूण 21 विद्यार्थिनी आणि 9 विद्यार्थ्यांनी रक्त नमुने दिले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. एस. उभाळे यांनी योगेश्वर पवार व त्यांच्या टीमचे स्वागत करून, ओळख करून दिली तसेच आभार अभिव्यक्ती केली.
कार्यक्रमाच्या नियोजनाचे मार्गदर्शन प्राचार्य पी.डी.बोरसे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.एम.एस.उभाळे, प्रा.रवींद्र पाटील, प्रा.निशा ठाकूर, प्रा. रेवती बागुल, प्रा. सुनीता वळवी व प्रा.आर.एस.वळवी यांनी प्रयत्न केले. तर प्रशासकीय सेवक शंकर गिरासे, कृष्णा बागुल व वीरपाल गिरासे सहकार्य केले.



