*शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज- प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज- प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील*
*शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज-प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील*
शहाजादा(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालय, बामखेडे त. त., ता. शहादा, जि. नंदुरबार आणि महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमी (MSFDA), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक आठवड्याच्या संगणक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमाला (FDP) उत्साहात प्रारंभ झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन माजी प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी, शिक्षणक्षेत्र सतत बदलत असून शिक्षकांनी तंत्रज्ञानाशी सुसंगत राहणे काळाची गरज आहे. अशा प्रशिक्षणांमुळे अध्यापन अधिक प्रभावी व गुणवत्तापूर्ण होते, असे मत व्यक्त केले.
संस्थेचे सचिव बी. व्ही. चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणात, प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण कौशल्यविकास प्रशिक्षण हे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पाया आहे, असे नमूद केले. कार्यक्रमाची भूमिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी मांडली. त्यांनी या उपक्रमातून प्राध्यापकांमध्ये संगणक साक्षरता, डिजिटल साधनांचा वापर आणि आधुनिक अध्यापन कौशल्यांचा विकास साधण्याचा उद्देश स्पष्ट केला. या प्रसंगी प्रशिक्षक डॉ. गौरव कडलग व MSFDA, पुणे येथील भार्गव वळंजू यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन समन्वयक प्रा. डॉ. योगेश पाटील यांनी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयांतून सहभागी झालेले 37 प्राध्यापक उपस्थित होते.



