*विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे कडक कारवाईचे संकेत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे कडक कारवाईचे संकेत*
*विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे कडक कारवाईचे संकेत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हयात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तसेच दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्याकडून देण्यात आले आहेत. सन 2024 या वर्षात जिल्हयाभरात अपघाताचे एकुण 169 प्रकरण दाखल होऊन त्यामध्ये 192 नागरिकांनी आपले प्राण गमावले असुन सन 2025 मध्ये त्यात वाढ होऊन जिल्हयाभरात एकुण 185 अपघातांची नोंद होऊन त्यात तब्बल 202 नागरिकांना आपला जिव गमवावा लागला आहे. त्यामुळे दुचाकी वाहन चालवितांना चालक व मागे बसणाऱ्या प्रवाशाने हेल्मेट परिधान करणे कायदयाने बंधनकारक असुन, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायदयान्वये कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे व वाहतुक शाखेमार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. "जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, स्वतःच्या व कुटूंबाच्या सुरक्षिततेसाठी दुचाकी वाहन चालवितांना नेहमी प्रमाणित हेल्मेटचा वापर करावा व वाहतुक नियमांचे पालन करावे. वाहतुक नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कोणतीही सुट न देता कठोर कारवाई करण्यात येईल," असे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.



