*गोताड वाडी आयोजित पंचक्रोशी अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत पांगरीतील श्री गगनगिरी क्रिकेट संघाचा प्रथम क्रमांक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गोताड वाडी आयोजित पंचक्रोशी अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत पांगरीतील श्री गगनगिरी क्रिकेट संघाचा प्रथम क्रमांक*
*गोताड वाडी आयोजित पंचक्रोशी अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत पांगरीतील श्री गगनगिरी क्रिकेट संघाचा प्रथम क्रमांक*
संगमेश्वर(प्रतिनिधी):-तालुक्यात घोडवली फाट्यावरील मैदानात गोताड वाडीने भरवलेल्या पंचक्रोशी अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत पांगरी गावातील श्री गगनगिरी क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकावला आणि आपल्या मायभूमीत पहिल्यांदाच अविस्मरणीय इतिहास रचला आहे. सदर स्पर्धा ही 10 व 11 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील 32 मातब्बर संघ सहभागी झाले होते त्यांच्या तुलनेत श्री गगनगिरी क्रिकेट संघ तुल्यबळ होता परंतु मैदानावर उतरुन लढण्याची जिद्द आणि जबरदस्त चिकाटी, महत्वकांक्षा यांच्या जोरावर या संघाने प्रथमच विजयश्री खेचून आणली सर्व विजयी टीमचे पांगरी ग्रामस्थांनी कौतुक केले असून तालुक्यातून विजयी टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.