*शिरवली शाळेची विधी विजय धुर्ये चालली नासा व इस्त्रो भेटीला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिरवली शाळेची विधी विजय धुर्ये चालली नासा व इस्त्रो भेटीला*
*शिरवली शाळेची विधी विजय धुर्ये चालली नासा व इस्त्रो भेटीला*
लांजा(प्रतिनिधी):-रत्नागिरी जिल्हा परिषदेने नासा, इस्रो भेटीसाठी घेतलेल्या अंतिम परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा शिरवलीची विद्यार्थिनी कुमारी विधि विजय धूर्ये हिने उज्वल यश प्राप्त करून लांजा तालुक्यातून नासा व इस्रो या अंतराळ संशोधन संस्थांना भेटी देण्यासाठी जाण्याचा बहुमान पटकवल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापूर्वी या शाळेचे दोन विद्यार्थी नासा, इस्रो संस्थांना व एक विद्यार्थीनी इस्रो संस्थेला भेट देण्यासाठी निवड झाली होती. शिरवली शाळेने सलग चौथ्या वर्षी या परिक्षेत उज्वल यश प्राप्त केल्याबद्दल शाळेचे अभिनंदन करण्यात येत आहे. विधी धुर्ये हिला मार्गदर्शन करणारे तिचे वर्गशिक्षक श्री. उमेश केसरकर, पदवीधर शिक्षिका सौ. श्रद्धा दळवी, मुख्याध्यापक नंदकुमार गोतावडे यांचे मार्गदर्शन लाभले. पालकांचे उत्तम सहकार्य मिळाले. विधी धुर्ये हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे व मार्गदर्शक शिक्षक, पालक यांचे पंचक्रोशीतून तसेच युवक मंडळ शिरवली, मौजे शिरवली ग्राम विकास मंडळ मुंबई समस्त ग्रामस्थ शिरवली यांनी जाहीर अभिनंदन केले आहे.



