*के. आर. पब्लिक स्कूलमध्ये भव्य सुर्य नमस्कार स्पर्धेचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के. आर. पब्लिक स्कूलमध्ये भव्य सुर्य नमस्कार स्पर्धेचे आयोजन*
*के. आर. पब्लिक स्कूलमध्ये भव्य सुर्य नमस्कार स्पर्धेचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कुल मध्ये भव्य सुर्य नमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने आयोजित क्रीडा सप्ताह 2025 - 26 अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रीडा सप्ताहाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडावृत्ती, संघभावना, शिस्त व नेतृत्वगुण विकसित करणे हा होता. शाळेच्या वस्तीगृहातील इ. 5 वी ते 9 वी च्या सुमारे 100 ते 150 विद्यार्थ्यांनी कार्यात्मक सहभाग नोंदविला. स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापिका डॉ. छाया शर्मा, क्रीडा शिक्षक श्री योगेश बेदरकर यांनी परिश्रम घेतले. क्रीडा सप्ताहाच्या समारोप प्रसंगी विजेत्या व उपविजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात आली.
संस्थेचे चेअरमन किशोर वाणी आणी उपाध्यक्ष सिध्दार्थ वाणी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.



