*कायद्याचे ज्ञान महिलांना होणे ही काळाची गरज-अॅड.संगिता पाटील*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कायद्याचे ज्ञान महिलांना होणे ही काळाची गरज-अॅड.संगिता पाटील*
*कायद्याचे ज्ञान महिलांना होणे ही काळाची गरज-अॅड.संगिता पाटील*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने युती सभा विभागाच्या अंतर्गत आत्मनिर्भय युवती अभियान 50 विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेचे उद्घाटनपर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच. एम. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली आणि कार्यशाळेचे प्रास्ताविक युती सभा समन्वयक डॉ. के.पी. पाटील यांनी केले. त्यांनी कार्यशाळेच्या संबंधी विद्यार्थींना महत्त्वपूर्ण माहिती दिली. व विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध अॅड. संगीता पाटील यांनी महिला आणि कायदे या विषयावर महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. महिलांसाठी कायदे केले आहेत त्याचा वापर महिलांनी कशाप्रकारे करावा आणि याच्यातून आपल्याला सुरक्षा कशी मिळवावी यासंबंधी त्यांनी आपल्या अनुभवातील विविध उदाहरणातून कायद्याच्या कलमांची जाणीव आणि जागृती करून दिली. तसेच विद्यार्थिनींनी निर्भय होऊन एखाद्या गोष्टीचा अन्याय सहन न करता त्याची जाणीव घरच्यांना कशी करून द्यावी व त्याच्यातून निर्भयता कशी होईल अशा अनेक गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास प्रमुख डॉ. सी. एस. करंके यांनी केले तर आभार प्रगटन प्रा. जयश्री गिरासे यांनी केले.



