*डी.पी.गावित आयुर्वेद महाविद्यालयात ‘स्पंदन स्प्रिंट फेस्ट’चा जल्लोषात शुभारंभ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डी.पी.गावित आयुर्वेद महाविद्यालयात ‘स्पंदन स्प्रिंट फेस्ट’चा जल्लोषात शुभारंभ*
*डी.पी.गावित आयुर्वेद महाविद्यालयात ‘स्पंदन स्प्रिंट फेस्ट’चा जल्लोषात शुभारंभ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील तालुक्यातील पथराई येथील डी. पी. गावित आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल येथे "स्पंदन स्प्रिंट फेस्ट" या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन 15 ते 19 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे अध्यक्ष राजेंद्र गावित यांच्या शुभहस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संचालिका ईला गावित, महाविद्यालयाच्या विश्वस्त व संयोजक डॉ. विभूती गावित,
सचिव ऋषिका गावित, तसेच प्राचार्य डॉ. समीर चौधरी प्रमुख उपस्थित होते. या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व हॉस्पिटलचे डी.वाय. एम.एस. व सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. सुदर्शना वाल्हे यांनी विशेष परिश्रम घेतले असून, तसेच डॉ. कमलेश खैरनार, डॉ. श्रीलक्ष्मी व प्रतिमा गुजर व क्रिडा प्रमुख डॉ. अजमल ए., यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. 'स्पंदन स्प्रिंट फेस्ट' अंतर्गत क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस आदी विविध मैदानी व मैदानी अंतर्गत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी तसेच प्राध्यापक वर्गामध्ये या क्रीडा महोत्सवाबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. हा क्रीडा महोत्सव केवळ स्पर्धेपुरता मर्यादित न राहता, संघभावना, शिस्त, आरोग्य व क्रीडावृत्ती जोपासणारा ठरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. क्रीडा स्पर्धेत महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते.



