*तळवडेतील इंजनोबा सेवा मंडळ, वाणेवाडी यांच्यातर्फे जि.प. शाळा तळवडे नं 3 शाळेला कलर प्रिंटर भेट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तळवडेतील इंजनोबा सेवा मंडळ, वाणेवाडी यांच्यातर्फे जि.प. शाळा तळवडे नं 3 शाळेला कलर प्रिंटर भेट*
*तळवडेतील इंजनोबा सेवा मंडळ, वाणेवाडी यांच्यातर्फे जि.प. शाळा तळवडे नं 3 शाळेला कलर प्रिंटर भेट*
पाचल(प्रतिनिधी):-तळवडे इंजनोबा सेवा मंडळ, वाणेवाडी यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तळवडे नं.3 या शाळेसाठी कलर प्रिंटर भेट देण्यात आला. मंडळाच्या या सत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मंडळाच्या वतीने हा प्रिंटर शाळेला सुपूर्द करण्यात आला. यावेळी महात्मा गांधीं तंटामुक्त समितीनचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष मसुरकर, माजी सरपंच लक्ष्मुमण शेरे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत गोबरे, वसंत शेरे, भालचंद्र गांधी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश सावंत, मंडळाचे कार्यकर्ते गणेश शेरे, गणपत कोलते, शाळेचे शिक्षक सुहास पवार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी शाळा व्यवस्थापन समितीने शाळेच्या गरजांसाठी प्रिंटर उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत इंजनोबा सेवा मंडळ, वाणेवाडी यांनी अत्यंत कमी कालावधीत विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या हिताचा विचार करून प्रिंटर उपलब्ध करून दिला. सध्याच्या डिजिटल युगामध्ये प्रिंटरचे शैक्षणिक महत्त्व लक्षात घेता, या उपक्रमाचा थेट लाभ विद्यार्थ्यांना तसेच शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाला होणार आहे. समाजाचे आपणही काही देणे लागतो या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. या सहकार्याबद्दल शाळेच्या व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने इंजनोबा सेवा मंडळ, वाणेवाडी यांचे आभार व्यक्त करुन सर्वत्र कौतुक केले जात आहे.



