*कोकणच्या 15 रणरागिणीनी इतिहास रचला, स्त्री पात्रांनी नटलेल्या नमनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोकणच्या 15 रणरागिणीनी इतिहास रचला, स्त्री पात्रांनी नटलेल्या नमनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*कोकणच्या 15 रणरागिणीनी इतिहास रचला, स्त्री पात्रांनी नटलेल्या नमनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
मुंबई(प्रतिनिधी):-नारी नारी म्हणून निंदिते तुला ग दुनिया सारी, चल उठ पोरी दाखव आता काय असते नारी, कोकणच्या इतिहासात प्रथमच फक्त स्त्री पात्राने नटलेल कोकणचे नमन 15 जानेवारी रोजी श्री शिवाजी नाट्य मंदिर येथे सादर झाले. या नमनामध्ये कोकणातील अनेक मान्यवर उपस्थित होते. आम्ही कोकणकर प्रस्तुत कोकणचे नमन वारसा पूर्वजांच्या पुण्याईचा आपल्या कोकण संस्कृतीचा, हा वारसा जोपासण्यासाठी कोकणातील स्त्रिया एकत्र येऊन फक्त पुरुष आता पर्यंत नमन कला सादर करत होती आता त्यांच्या खांद्याला खांदा देऊन फक्त स्त्री पात्राने नमन स्त्रियांनी सादर केल. सादरीकरण नेत्र सुख देणार होतं कृष्णलीला खूपच सुंदर रित्या सादरीकरण करण्यात आली. राधा कृष्णाचा जन्म पासून ते मृत्यू पर्यंत असलेला भाग दाखविण्यात आला. रसिक राजाला खूप पसंती पडला. द्रौपदी वस्त्र हरण सोबत वर्तमानमध्ये होणारे स्त्रीयांबाबत सत्यता दाखविण्यात आली. कालिया नागाचा सिन पाहण्यासारखा होता. सोबत सत्य घटनेवर समाजाला दिशा देणार रूढी परंपरा वर वेळेनुसार आपण बदली पाहिजे. स्त्रियांना पतीच्या निधनानंतर आपले स्त्री धन घालावे की नाही हा त्यांचा त्यांनी निर्णय घ्यावं.काय चांगले काय वाईट याची चांगल्या प्रकारे सादरीकरण दाखविण्यात आले. स्त्रियांना होणार मासिक पाळीबाबत जे गैरसमज होत आहेत त्याबाबत चांगल्या प्रकारे विषय रंगभूमी वर सादरीकरण करून स्पष्टता करण्यात आली. रसिक राजाला हा विषय भावला. लेखक दिग्दर्शक - कृष्णा नंदा शांताराम येद्रे यांनी चांगल्या प्रकारे विषय मांडून कथानक वादळ - कहाणी स्त्री शक्तीची ही नाट्यकला कृती रसिक राजा पर्यंत पोचवण्यात यशस्वी झाले. स्त्रीयांना समाजात मान सन्मान योग्य तो मिळाला पाहिजे त्या साठी हे साजरीकरण रसिक राजाला भावले. अभिनेत्री साक्षी डोंगरे, अभिनेत्री सोनाली चव्हाण, चेतना मोहिते, श्वेता डोरलेकर, वेदिका मांडवकर या सारखे अनेक कलाकार यांनी आपल्या अभिनयाची छाप रसिक राजापर्यंत पोचवली. कोकणच्या इतिहासात हा बदल नक्कीच येणार भावी पिढीला प्रेरणा देईल. कोकणच्या या वाघिणी पुरुषांपेक्षा कमी नाही हे त्यांनी दाखवून दिले. पूर्वजांचा वारसा स्त्रिया ही जोपासू शकतात हे रसिक राजाच्या साक्षीने सत्यात उतरले.



