*शहादा येथील जनावर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे, शाखेच्या ताब्यात, शहादा पोलीस ठाणे येथील एकुण 3 गुन्हे उघड, 7 आरोपीसह एक विधीसंघर्षग्रस्त बालक ताव्यात, एकुण 10 लाख, 10 हजारांचा म
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शहादा येथील जनावर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे, शाखेच्या ताब्यात, शहादा पोलीस ठाणे येथील एकुण 3 गुन्हे उघड, 7 आरोपीसह एक विधीसंघर्षग्रस्त बालक ताव्यात, एकुण 10 लाख, 10 हजारांचा म
*शहादा येथील जनावर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे, शाखेच्या ताब्यात, शहादा पोलीस ठाणे येथील एकुण 3 गुन्हे उघड, 7 आरोपीसह एक विधीसंघर्षग्रस्त बालक ताव्यात, एकुण 10 लाख, 10 हजारांचा मुद्देमाल हस्तगत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हयातील शहादा पोलीस स्टेशन हद्यीत मेंढया चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीविरुध्द स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीसांनी मोठी व यशस्वी कारवाई केली आहे. शहादा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्र.653/2025 भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम-303(2) अन्वये दाखल गुन्हयांच्या तपासात ही कारवाई करण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी शहादा तालुक्यातील शेतांमधून मेंढया चोरी झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार यांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरु केला होता. तपासादरम्यान चोरीचा माल विकत घेणारा आरोपी मोहसिन ऊर्फ राजा हारुन खान (वय-32 रा. राजपूर जि. बडवाणी, मध्यप्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले, त्याच्याकडून सखोल चौकशीत आरोपीने वर नमुद गुन्हयातील मेंढया या राजस्थान येथील चिंटु बंजारा, रावल बंजारा व त्यांचे साथीदारांच्या मदतीने शहादा परिसरातील विविध शेतांमधून मेंढया चोरी केल्याची कबुली दिली. सदर टोळी ही रात्री मेंढपाळांच्या वाडयांमधून मेंढया चोरी करुन त्या विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान पोलीसांनी आरोपींकडुन खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे. एक राखाडी रंगाची इको कार (RJ20UB5627), एक पांढऱ्या रंगाचा छोटा हत्ती (DOST LS), एक HF डिलक्स मोटारसायकल, मेंढया चोरीसाठी वापरलेली साधने तसेच मेंढया विक्रीतून मिळालेली रोख रक्कम सह एकुण दहा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत चिंटू कालू बंजारा, वय 20 वर्ष, रावल ऊर्फ राहुल कालू बंजारा, वय 22 वर्ष, ******* वय 17 वर्ष (विधीसंघर्षग्रस्त बालक), लक्ष्मण मदन बंजारा, वय 19 वर्ष, धर्मराज बाबुलाल बंजारा, वय 23 वर्ष, सोन जिया बंजारा, वय 29 वर्ष सर्व रा. कोन्ही, पो. डाबी ता.ताळेदा, जि. बुंदी, राज्य राजस्थान, अरबाज नुरमोहम्मद शेख, वय-26 वर्ष रा. हाटबर्डी, रापजुर, जि. बडवाणी, मध्यप्रदेश असे 7 आरोपीसह विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. सदर गुन्हयाचे तपासात मेंढी चोरीचे गुन्हे त्यामध्ये गु.र.नं. 653/2025, 668/2025 व 31/2026 असे एकुण 3 गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे. सर्व आरोपींविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात आलेली असून पुढील तपास सुरु आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि हेमंत पाटील, शहादा पोलीस ठाण्याचे पोनि हेमंतकुमार पाटील, पोसई विकास गुंजाळ, पोसई मुकेश पवार, पोहेकॉ मुकेश तावडे, विशाल नागरे, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, ज्ञानेश्वर पाटील, पोना/विकास कापुरे, अविनाश चव्हाण, पोशि/शोएब शेख, भरत उगले, सतीष घुले यांच्या पथकाने केली आहे.



