*मुलींमध्ये आत्मनिर्भयता निर्माण होणे ही काळाची गरज –रविंद्र बागुल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुलींमध्ये आत्मनिर्भयता निर्माण होणे ही काळाची गरज –रविंद्र बागुल*
*मुलींमध्ये आत्मनिर्भयता निर्माण होणे ही काळाची गरज –रविंद्र बागुल*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालय तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या विद्यार्थी विकास विभागांतर्गत युती सभा आणि आत्मनिर्भय युती अभियान अंतर्गत आयोजित तीनदिवसीय कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी महाविद्यालयातील 50 विद्यार्थिनींनी क्षेत्रीय भेटीच्या उपक्रमांतर्गत सारंगखेडा पोलीस स्टेशनला भेट दिली.
यावेळी सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना, मुलींमध्ये आत्मनिर्भयता निर्माण होणे ही आजच्या समाजाची गरज आहे, असे प्रतिपादन केले. पोलीस स्टेशनमध्ये चालणाऱ्या दैनंदिन कारभाराची माहिती देत त्यांनी सायबर क्राईम, मोबाईलच्या माध्यमातून होणारे गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियावरील धोके तसेच अशा गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्यामागील कारणे, मोबाईल संस्कृतीचे दुष्परिणाम यावर प्रकाश टाकत त्यांनी विद्यार्थिनींना मोबाईलपेक्षा पुस्तकांशी मैत्री ठेवा, असे आवाहन केले. वाचनामुळे उज्वल भविष्य घडते आणि देशसेवेची संधी निर्माण होते, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी विद्यार्थिनींचे गट करून पोलीस स्टेशनमधील विविध विभागांची माहिती देण्यात आली. गृहखात्यापासून ते स्थानिक पोलीस स्टेशनपर्यंत असलेली प्रशासकीय रचना, विविध अधिकारी व त्यांची कार्यपद्धती यांचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले. पोलीस स्टेशन परिसरात कोणत्या प्रकारची कामे केली जातात, नागरिकांसाठी उपलब्ध सेवा आणि कायदेशीर प्रक्रिया याबाबतही विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली. या क्षेत्रीय भेटीसाठी संस्थेने बसेसची विद्यार्थ्यांनीना व्यवस्था करून दिली होती.
या कार्यशाळेचे नियोजन व आयोजन विद्यार्थी विकास प्रमुख डॉ. सी. एस. करंके आणि युती सभा समन्वयक डॉ. के. पी. पाटील यांनी केले होते.



