*शनिमांडळ येथे माता पालक मेळाव्या अंतर्गत सौभाग्यवतींचा मेळावा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शनिमांडळ येथे माता पालक मेळाव्या अंतर्गत सौभाग्यवतींचा मेळावा*
*शनिमांडळ येथे माता पालक मेळाव्या अंतर्गत सौभाग्यवतींचा मेळावा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथे माता पालक मेळाव्या अंतर्गत सौभाग्यवतींचा मेळावा भरण्यात आला. साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शनिमांडळ येथील मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुंदन पाटील पर्यवेक्षक आदरणीय पि यू आव्हाड व सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने एक आगळावेगळा धार्मिक- सांस्कृतिक - पारंपारिक - भावनिक सोहळा आज विद्यालयात संपन्न झाला तो म्हणजे
'हळदी कुंकू'. या पारंपरिक सोहळ्याचे फायदे, महत्त्व आणि त्यामागील वैज्ञानिक व सामाजिक कारणे यांचा आढावा, ज्यात हळदी- कुंकवामुळे आरोग्य सुधारते (जीवाणूविरोधी) सामाजिक बंध घट्ट होतात आणि स्त्रियांच्या कल्पकतेला वाव मिळतो. हा सोहळा मकर संक्रांतीनंतर मोठ्या उत्साहात साजरा होतो, जिथे सुवासिनी एकमेकींना हळद- कुंकू लावून भेटवस्तू देतात, हे सौभाग्य आणि आपुलकीचे प्रतीक मानले जाते.
याच संदर्भात मुख्याध्यापक कुंदन पाटील पर्यवेक्षक पी यु आव्हाड, ज्येष्ठ शिक्षिका एम सी कासार, बी आर वाघ, एस आर वसावे, निकुंभे यांनी विविध उदाहरणासकट हळदीकुंकू चे महत्व सांगितले. हळदी कुंकवाचे फायदे
आरोग्य: हळदीमधील जीवाणू-विरोधी वातावरण शुद्ध ठेवतात आणि घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतात. तसेच, हळद आणि कुंकू हे सौभाग्यद्रव्य असल्याने त्याचे महत्त्व आहे. सामाजिक बंध: हा समारंभ स्त्रियांना एकत्र येऊन सुख- दुःख वाटून घेण्यास, विचारांची देवाणघेवाण करण्यास आणि सामाजिक संबंध दृढ करण्यास मदत करतो. वैज्ञानिक व आध्यात्मिक कारण: हळद-कुंकू लावणे म्हणजे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीला जागृत करणे, असे मानले जाते.
सांस्कृतिक महत्त्व: मकर संक्रांतीच्या निमित्ताने हा सोहळा साजरा होतो. स्त्रिया एकमेकींना ``तिळगुळ घ्या आणि गोड बोला'' असे म्हणत जुने हेवेदावे विसरतात. हे वैवाहिक सौभाग्याचे प्रतीक आहे. समारंभाची पद्धत सुवासिनी एकमेकींना हळद- कुंकू लावतात आणि भेटवस्तू देतात.
समारंभात उखाणे घेतले जातात आणि स्त्रियांची कल्पकता जागृत होते. त्या संकट सांस्कृतिक मंडळां ने आलेल्या सर्व सौभाग्यवतींसाठी स्वागत गीत, नाटिका, गीत गायन, नृत्य ठेवून आजच्या काळात महिलांचे महत्त्व, महिलांची विशेष प्रगती, महिलांमुळे असलेली सांस्कृतिक- धार्मिक - पारंपारिक- पारिवारिक प्रगती याविषयी शाळेच्या विद्यार्थिनीं मार्फत सादरीकरण करून घेतले.



