*कु.रंजना पावरा इयत्ता सहावी या विद्यार्थिनीच्या मृत्यूची चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करण्याबाबत निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कु.रंजना पावरा इयत्ता सहावी या विद्यार्थिनीच्या मृत्यूची चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करण्याबाबत निवेदन*
*कु.रंजना पावरा इयत्ता सहावी या विद्यार्थिनीच्या मृत्यूची चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करण्याबाबत निवेदन*
साक्री(प्रतिनिधी):-अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना कु.रंजना इसमल पावरा इयत्ता सहावी या विद्यार्थिनीच्या मृत्यूची चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. शासकीय आश्रम शाळा सुलवाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या शाळेचे मुख्याध्यापक मंडलिक यांनी सदर कु. रंजना इसमल पावरा ही विद्यार्थिनी बऱ्याच दिवसापासून आजारी होती. शाळेच्या स्री अधिक्षिका या रजेवर होत्या, मुलींची कार्यवाहक जबाबदारी मुख्याध्यापक यांच्या पत्नी शिक्षिका म्हणून याचं शासकिय आश्रम शाळेत कार्यरत आहेत. मुलींना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती, सदर विद्यार्थिनी आजारी होती. आजारी विद्यार्थिनीला दवाखान्यात घेऊन गेले असता डॉक्टरांनी ऍडमिट करण्यास सांगितले होते परंतु, मंडलिक या मुख्याध्यापकाने मुलीला पुढील दवाखान्यात उपचारासाठी न पाठवता पालकांना बोलावून दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी कु. रंजना इसमल पावरा या विद्यार्थिनीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
सदर विद्यार्थिनीला योग्य उपचार न मिळाल्याने मुख्याध्यापक व संबंधित शिक्षिका यांच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप मुलीला दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी जीव गमवावा लागला. शासकीय आश्रम शाळेमध्ये शिक्षिका व इतर कर्मचारी यांचा तुटवडा असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांची काळजी घेतली जात नाही. शासनाने खाजगी कंपनीच्या माध्यमातून नर्स आश्रम शाळांमध्ये भरलेले आहेत, परंतु त्यांचा काहीही उपयोग होतांना दिसत नाही. शासकीय आश्रम शाळा मध्ये विद्यार्थ्यांचा मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने योग्य ते उपाययोजना करण्यात यावी. सदर घटना ही अत्यंत गंभीर स्वरुपाची असून संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व बेजबाबदार शिक्षिका यांना त्वरित निलंबित करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर गणेश बळवंत गावित जिल्हाप्रमुख महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान धुळे, तानाजी प्रकाश बहिरम सामाजिक कार्यकर्ता मु. होळ्याचापाडा पो. सुकापुर ता. साक्री जि. धुळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



