*राजापूर-शिळ-सौंदळ रेल्वे स्टेशन जाणारा रस्ता उंचीकरण, रुंदीकरणासाठी अरविंद लांजेकर यांचे बांधकाम विभागाला निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूर-शिळ-सौंदळ रेल्वे स्टेशन जाणारा रस्ता उंचीकरण, रुंदीकरणासाठी अरविंद लांजेकर यांचे बांधकाम विभागाला निवेदन*
*राजापूर-शिळ-सौंदळ रेल्वे स्टेशन जाणारा रस्ता उंचीकरण, रुंदीकरणासाठी अरविंद लांजेकर यांचे बांधकाम विभागाला निवेदन*
राजापूर(प्रतिनिधी):-शहराकडून शीळ, गोठणे दोनिवडे, चिखलगाव सौंदळ रेल्वे स्टेशनकडे तसेच पाचल कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण, उंचीकरण मजबुतीकरण करावे अशी मागणी कोंडये येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता देसाई आणि बावधनकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मार्गावर सौंदळ रेल्वे स्थानक असल्याने तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेला हे स्थानक जवळचे असल्याने वेळ व पैसा वाचत आहे त्यामुळे या स्थानकांवर मुंबई कडे येणाऱ्या व जाणाऱ्या तसेच गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते सदरचा रस्ता अर्जुना नदी लगत असल्याने या रस्त्यावरील सखल भागात पाणी येत असल्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद होतो राजापूर मोठ्या ब्रिज नजीक पावसकर वाडी, शिळ गांगोमंदीर ब्रिजजवळ, गोठणे दोनिवडे येथील साखरकर आणि खलिफे घराच्या नजदीक, चिखलगाव बादयाचा माळ व पाजवेवाडी नजीकचा सखल भाग आदी विविध ठिकाणी पुराचे पाणी रस्त्यावर येऊन जनजीवन विस्कळित होते. आणि या भागातील येणाऱ्या जाणाऱ्या जनतेची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण, उंचीकरण, मजबुतीकरण करणे गरजेचे आहे असे अरविंद लांजेकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.



