*सांगलीतील कला प्रदर्शनात कोसुंबची सुकन्या कु. तेजश्री जाधव यांच्या कलाकृतीची निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सांगलीतील कला प्रदर्शनात कोसुंबची सुकन्या कु. तेजश्री जाधव यांच्या कलाकृतीची निवड*
*सांगलीतील कला प्रदर्शनात कोसुंबची सुकन्या कु. तेजश्री जाधव यांच्या कलाकृतीची निवड*
संगमेश्वर(प्रतिनिधी):-यावर्षी घेण्यात आलेल्या 63 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी मुंबईतील एस.एन. डी.टी वुमन्स युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेत असलेली व तालुक्यातील कोसुंब गावची सुकन्या कु. तेजश्री राहुल जाधव हिच्या चित्र कलाकृतीची निवड करण्यात आली आहे. मुंबईतील कला संचलनातर्फे 63 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे यावर्षी आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सांगली येथे पार पडणार असून या प्रदर्शनात मुंबईतील एस.एन. डी.टी वुमन्स युनिव्हर्सिटी, चर्नी रोड, मुंबई येथे मास्टर इन फाईन आर्टचे शिक्षण घेत असलेली कु. तेजश्री राहुल जाधव यांच्या Sympathy (सांत्वन) या चित्र कलाकृतीची निवड करण्यात आली आहे. या कला प्रदर्शनात कोकण सुकन्येच्या कलाकृतीची निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. याबद्दल विद्यार्थी वर्ग, प्राध्यापक, मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांनी अभिनंदनाचा वर्षाव करीत आहे. तिच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीकरिता शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहे. कु.तेजश्री राहुल जाधव हि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा लांजाचे सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक राहुल बाबू जाधव व गृहिणी असलेल्या सौ.निलांबरी जाधव यांच्या त्या द्वितीय सुकन्या आहे. यावेळी चिपळूण तालुक्यातील मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या कौटुंबिक सेवाभावी संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांची कु. तेजश्री जाधव हिने प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना भगवान गौतम बुद्धांची स्वहस्ते साकारलेली अप्रतिम अशी कलाकृती भेट दिली. तीच्या या कार्यकर्तृत्वाची स्तुती करून मनस्वी शुभाशिर्वाद परत्वे सदिच्छा व्यक्त केल्या.



