*श्री महालिंग मंदिर निधी संकलनासाठी 15 गाव क्रिकेट फेडरेशनतर्फे "पंधरागाव चषक स्पर्धा 2026" चे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्री महालिंग मंदिर निधी संकलनासाठी 15 गाव क्रिकेट फेडरेशनतर्फे "पंधरागाव चषक स्पर्धा 2026" चे आयोजन*
*श्री महालिंग मंदिर निधी संकलनासाठी 15 गाव क्रिकेट फेडरेशनतर्फे "पंधरागाव चषक स्पर्धा 2026" चे आयोजन*
खेड(प्रतिनिधी):-15 गाव क्रिकेट फेडरेशन ता.खेड, जि.रत्नागिरी यांच्या वतीने “15 गाव चषक स्पर्धा 2026” चे आयोजन 24, 25 व 26 जानेवारी 2026 रोजी मौजे धामणंद येथे करण्यात आले आहे. पंधरा गावातील 42 संघांना एकत्र आणून क्रिकेटला सुसूत्र व शिस्तबद्ध नियमावलीत बांधण्याचे मोलाचे कार्य 15 गाव क्रिकेट फेडरेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे.मागील 6 वर्षांत फेडरेशनची 3 पर्वे यशस्वीरीत्या पार पडली असून या वर्षी फेडरेशनचे 4 थे पर्व मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नसून, एक सामाजिक उपक्रम म्हणून फेडरेशन आपली वेगळी व भक्कम ओळख निर्माण करत आहे.तरी या अनुषंगाने, शनिवार 24 जानेवारी ते सोमवार 26 जानेवारी 2026 दरम्यान मौजे धामणंद या मध्यवर्ती ठिकाणी होणाऱ्या या क्रिकेट महासंग्रामाला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित व शतगुणित करावा फेडरेशन चषकाची भव्य मिरवणूक, पंधरागावातील जनतेसाठी महाआरोग्य शिबिर, 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा “आधार काठी देऊन सन्मान”
स्पर्धेतून जमा होणारा संपूर्ण निधी श्री महालिंग मंदिरासाठी अर्पण करण्यात येणार आहे अशी माहिती 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष
महेश महापदी यांनी दिली आहे.



