*के. आर.पब्लिक स्कुल द्वारे जेईई व निट परिक्षेबाबत करीअर गाईडन्स सेमिनारला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के. आर.पब्लिक स्कुल द्वारे जेईई व निट परिक्षेबाबत करीअर गाईडन्स सेमिनारला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*के. आर.पब्लिक स्कुल द्वारे जेईई व निट परिक्षेबाबत करीअर गाईडन्स सेमिनारला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
नंदुरबार(प्रतिनिधी):-11 जोनवारी 2026 श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूल नंदुरबार पुरस्कृत जेईई, निट व इतर स्पर्धात्मक परिक्षांचे सेमिनार आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रम कन्यादान मंगल कार्यालयात दोन सत्रात पार पडला. यात सुप्रसिध्द मार्गदर्शक व समुपदेशक डॉ. राजकुमार आडकर, डॉ. अनिता आडकर, डॉ. अरुण फोंडे इ. तज्ञांनी मार्गदर्शन केले. इ. 6 वी ते 10 वी फाऊंडेशन विद्यार्थी व पालकांसाठी सकाळी 10 ते 12 वा चे सत्र होते. व 11 वी ते 12 वी व रिपीटर विद्यार्थ्यांचे सत्र दुपारी 2 ते 4 वा. पार पडले दोन्ही सत्रा मध्ये तज्ञांनी विद्यार्थी व पालकांच्या प्रत्येक समस्येचे निरसन केले. या सेमिनारच्या अध्यक्षपदी संस्थेचे चेअरमन किशोर वाणी होते. उपाध्यक्ष सिध्दार्थ वाणी, संचालिका सौ. केतकी वाणी, प्राचार्या डॉ. छाया शर्मा सर्व फॅकल्टी मेमबर्स आणि मोठया संख्येने पालकांची उपस्थिती लाभली. सदर सेमिनारचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन नदीम शेख यांनी केले.