*ग्रामपंचायत भोनगाव हद्दीत सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करणेबाबत निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ग्रामपंचायत भोनगाव हद्दीत सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करणेबाबत निवेदन*
*ग्रामपंचायत भोनगाव हद्दीत सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करणेबाबत निवेदन*
साक्री(प्रतिनिधी):-ग्रामपंचायत भोनगाव हद्दीत सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करणेबाबत निवेदन देण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील भोनगाव ग्रामपंचायत हद्दीत अवैध दारू विक्री व दारू सेवन मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. सदर प्रकारामुळे गावातील शांतता भंग होत असून महिला, लहान मुले तसेच सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दारू सेवनामुळे गावामध्ये भांडणे, शिवीगाळ, कौटुंबिक वाद तसेच सार्वजनिक ठिकाणी अनुचित प्रकार घडत असून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी तोंडी तक्रारी केलेल्या असून सदर बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे.
ग्रामपंचायत स्तरावर याबाबत चर्चा करण्यात आली असून, भोन गावात सुरु असलेली अवैध दारू विक्री व दारू सेवन तात्काळ बंद करण्यात यावे, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे, सदर प्रशासनाने या बाबीची तात्काळ व गंभीर दखल घेऊन संबंधित इसमांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी व भोनगाव ग्रामपंचायत हद्दीत अवैध दारू विक्री व दारू सेवन पूर्णपणे बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.



