*राजापूर तालुक्यातील चुनाकोळवणचे सरपंच श्रीकांत मटकर राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान 2025 ने सन्मानित*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूर तालुक्यातील चुनाकोळवणचे सरपंच श्रीकांत मटकर राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान 2025 ने सन्मानित*
*राजापूर तालुक्यातील चुनाकोळवणचे सरपंच श्रीकांत मटकर राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान 2025 ने सन्मानित*
राजापूर(प्रतिनिधी):-स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान 2025 रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण गावचे सरपंच श्रीकांत सरिता श्रीधर मटकर यांना दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी अहिल्यानगर येथे झालेल्या राज्यस्तरीय समारंभात प्रदान करण्यात आला. त्यांच्या लोकाभिमुख, पारदर्शक व विकासाभिमुख कार्याची ही राज्यस्तरीय दखल आहे. सरपंच श्रीकांत मटकर यांनी कार्यकाळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाला गती दिली. स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, शिक्षण तसेच महिला व युवक सक्षमीकरण या क्षेत्रांत त्यांनी राबवलेले उपक्रम उल्लेखनीय ठरले आहेत. ‘स्वच्छ गाव - सुंदर गाव’ या संकल्पनेतून कचरा व्यवस्थापन, स्वच्छता मोहिमा आणि पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीपणे राबवून गावाचा कायापालट करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
गावातील पायाभूत सुविधांचा विकास, शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि त्याचा लाभ थेट सर्वसामान्य ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांनी विशेष भर दिला. ग्रामसभा, नागरिक सहभाग आणि पारदर्शक कारभार ही त्यांच्या प्रशासनाची ओळख बनली आहे. आपत्कालीन परिस्थितीत तसेच आरोग्यविषयक आव्हानांमध्ये ग्रामस्थांसाठी त्यांनी घेतलेली तत्पर भूमिका देखील कौतुकास्पद ठरली. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांनी त्यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान 2025 देऊन गौरविले. या सन्मानामुळे चुनाकोळवण गावासह राजापूर तालुका व रत्नागिरी जिल्ह्याचा नावलौकिक राज्यपातळीवर वाढला असून सर्व स्तरांतून सरपंच श्रीकांत श्रीधर मटकर यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. त्यांची ही कामगिरी ग्रामीण विकासात कार्यरत असलेल्या इतर लोकप्रतिनिधींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.



