*मुचकुंदी परिसर विकास संघातर्फे राजापूर लांजा तालुक्यातील दहावी परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुचकुंदी परिसर विकास संघातर्फे राजापूर लांजा तालुक्यातील दहावी परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर*
*मुचकुंदी परिसर विकास संघातर्फे राजापूर लांजा तालुक्यातील दहावी परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर*
राजापूर(प्रतिनिधी):-शैक्षणिकदृष्ट्या आयुष्याच्या अत्यंत महत्वाच्या वळणावर असताना इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्यादृष्टीने शिक्षणाचा राजमार्ग अधिक सुलभ व्हावा यासाठी "एमपीव्हीएस शैक्षणिक विभाग" अंतर्गत परिक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी "विशेष मार्गदर्शन" शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर शनिवार दि.17 जानेवारी 2026 रोजी स.10 ते दु 1 खावडी हायस्कूल, ता. लांजा तसेच रविवार दि. 18 जानेवारी 2026 रोजी स. 9.30 ते 12.30 वडवली हायस्कूल, राजापूर येथे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरात वैभव भगते, आयकर निरिक्षक मुंबई/एमपीव्हीएस शैक्षणिक विभाग प्रमुख, डी.डी.देसाई माजी मुख्याध्यापक खावडी हायस्कूल, रमाकांत सावंत न्यू इंग्लिश स्कूल लांजा आदी वक्ते मार्गदर्शन करणार आहेत, 10 वी बोर्ड परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी 'दहावी परीक्षेला सामोरे जाताना' या शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, विशेष गुणांकन प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी या शिबिरास हजर राहावे असे आवाहन मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर, मुंबई (रजि.) संघाच्या शैक्षणिक विभागाने केले आहे.