*राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्ताने देवरे विद्यालयात व्याख्याना द्वारे अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्ताने देवरे विद्यालयात व्याख्याना द्वारे अभिवादन*
*राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्ताने देवरे विद्यालयात व्याख्याना द्वारे अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील धंगाई विधायक कार्य मंडळ म्हसदी संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त शिक्षक अशोक शिंदे सर्वोदय माध्यमिक विद्यालय सिंदगव्हाण व चव्हाण, मुख्याध्यापक, डॉ. एच.बी.पाटील माध्यमिक विद्यालय होळ तर्फे रनाळे व देवरे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी. साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मनोगतातून राजमाता जिजाऊंचे व स्वामी विवेकानंदांचे कार्य मांडण्यात आले. विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी कु.देवर्षी पाटील हिने राजमाता जिजाऊंची तर इ. नववीचा विद्यार्थी विपुल पाटील याने स्वामी विवेकानंद यांची वेशभूषेद्वारे भूमिका बजावत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे उपशिक्षक डी.बी. भारती यांनी 'यशोगाथा राजमाता जिजाऊंची' विषयावर व्याख्यान देत जीवन कार्याचा परिचय आपल्या व्याख्यानातून दिला. उपशिक्षक एम.डी. नेरकर यांनी 'युवांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद' या विषयावर स्वामीजींचे विश्वव्यापक कार्य आपल्या भाषणाद्वारे मांडले. प्रमुख अतिथी अशोक शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या विविध अंगी भूमिकांचे कौतुक करत जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणातून डी.डी. साळुंके यांनी विद्यार्थ्यांच्या वकृत्व कला सादरीकरणाचे विविध पैलूंवर मार्गदर्शन करत दोघं महान व्यक्तिमत्त्वांची कार्यक्षेत्रे आपल्या भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.बी. अहिरे तर आभार एस.एच.गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सी. व्ही.नांद्रे,वाय.डी बागुल, एम. एस. मराठे,ए.एस.बेडसे तसेच डी.बी. पाटील, एस.जी. पाटील एच.एम. खैरनार आदींनी संयोजन केले.



