*आदिवासी एकता परिषदचे’नवीन म्हणुन अध्यक्ष प्रा. अशोक बागुल यांची निवड झाली*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आदिवासी एकता परिषदचे’नवीन म्हणुन अध्यक्ष प्रा. अशोक बागुल यांची निवड झाली*
*आदिवासी एकता परिषदचे’नवीन म्हणुन अध्यक्ष प्रा. अशोक बागुल यांची निवड झाली*
पिंपळनेर(प्रतिनिधी):-आदिवासी एकता परिषद आयोजित 33 वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन हे मध्यप्रदेशातील चैनपुरा (नेपानगर), जि. बुऱ्हाणपूर येथे 13, 14 व 15 जानेवारी 2026 रोजी भव्य स्वरूपात संपन्न झाला. या महासंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाचे संस्थापक महाराष्ट्र राज्यातून प्रा. अशोक बागुल यांचा आदिवासी एकता परिषद अध्यक्ष म्हणुन नेमणुक करण्यात आली. त्यानिमित्ताने पारंपरिक पगडी परिधान करून सन्मान केला गेला. मागील आठवड्यात नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य आदिवासी एकता परिषद अध्यक्षीय मंडळाच्या बैठकीत प्रा. बागुल यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आज तब्बल चार तास चाललेल्या राष्ट्रीय अध्यक्षीय मंडळाच्या अंतिम बैठकीत, त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक कार्याचा व्यापक आवाका, नेतृत्वक्षमता व आदिवासी समाजासाठी केलेले योगदान लक्षात घेऊन, अध्यक्षीय मंडळाने एकमताने त्यांच्या निवडीला अंतिम मंजुरी दिली होती. गेल्या 25 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या सामाजिक कार्याचे देशपातळीवर झालेले हे कौतुक, नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम सामाजिक कार्यकर्त्यांसाठी सन्मानास्पद मानले जात आहे. महासंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात हा सन्मान आदिवासी सांस्कृतिक एकतेच्या चळवळीस अधिक बळ देणारा ठरला. आदिवासी एकता परिषदचे नवीन अध्यक्ष प्रा. अशोक बागुल साहेब यांना आदिवासी एकता परिषद सरचिटणीस डोंगर बागुल, महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाचे धुळे जिल्हा प्रमुख गणेश गावित, जिल्हाध्यक्ष तानाजी बहिरम, नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेंद्र पवार नाशिक जिल्हाध्यक्ष राम चौरे साहेब सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती. भारती भोये, कळवण तालुका अध्यक्ष के. के. गांगुर्डे यांनी बागुल यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



