*रावल बी.एड.महाविद्यालयात भूगोल दिन व मकर संक्रांत उत्साहात साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रावल बी.एड.महाविद्यालयात भूगोल दिन व मकर संक्रांत उत्साहात साजरी*
*रावल बी.एड.महाविद्यालयात भूगोल दिन व मकर संक्रांत उत्साहात साजरी*
दोंडाईचा(प्रतिनिधी):-येथील श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयात भूगोल दिन व मकर संक्रांती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. सर्वप्रथम प्रा.रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे उद्देश स्पष्ट केला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. पी.डी. बोरसे यांच्या हस्ते व सर्व प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन व अभिवादन करण्यात आले. सुखदेव वसावे या विद्यार्थ्यांनी निसर्गात घडणाऱ्या विविध प्रक्रियांचे निरीक्षण करून संशोधन आवश्यक असल्याचे मनोगतातून सादर केले. त्यानंतर गणेश पारखे या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांनी पर्यावरणाचा सखोल अभ्यास करून अनेक युद्ध मोहिमा साध्य केल्याचे सांगितले. प्रा.रवींद्र पाटील यांनी भूगोल दिनाचे व संक्रांतीचे महत्त्व मनोगतातून सादर केले. प्रा.डॉ. एम एस उभाळे यांनी निसर्ग व मानवी यातील संबंध समजून घेणे, पर्यावरण संरक्षणाविषयी जाणीव जागृती करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, राष्ट्रीय व जागतिक समज वाढवणे यासाठी भूगोल दिन साजरा केला जातो. तर सूर्याचे उत्तरायण, निसर्ग शेतीचे नाते समजून घेणे, संक्रांतीच्या आरोग्यदृष्ट्या महत्त्व तसेच सांस्कृतिक व सामाजिक एकोपा वाढीसाठी मकर संक्रांत साजरी केली जाते, असे सांगितले. प्राचार्य पी.डी.बोरसे यांनी विद्यार्थ्यांना भूगोल दिन व संक्रांतीच्या शुभेच्छा अध्यक्षीय मनोगतातून दिल्या. दीपमाला भामरे यांनी सूत्रसंचालन तर प्रियंका सोनवणे यांनी आभार अभिव्यक्ती केली. त्यानंतर सामूहिक तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाच्या नियोजनाचे मार्गदर्शन प्राचार्य पी.डी.बोरसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.एम.एस.उभाळे, प्रा.रवींद्र पाटील, प्रा. निशा ठाकूर, प्रा. रेवती बागुल, प्रा. सुनीता वळवी व प्रा. आर.एस.वळवी यांनी प्रयत्न केले. तर प्रशासकीय सेवक शंकर गिरासे, कृष्णा बागुल,अमर राजपूत व वीरपाल गिरासे सहकार्य केले.



