*ग्रामपंचायत भुजगाव आणि CYDA संस्थेचा आदर्श उपक्रम, गावातून घडणार महिला उद्योजक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ग्रामपंचायत भुजगाव आणि CYDA संस्थेचा आदर्श उपक्रम, गावातून घडणार महिला उद्योजक*
*ग्रामपंचायत भुजगाव आणि CYDA संस्थेचा आदर्श उपक्रम, गावातून घडणार महिला उद्योजक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मुख्यमंत्री पंचायत राज अभियान व आदर्श ग्राम अभियान अंतर्गत CYDA संस्था नंदुरबार आणि ग्रामपंचायत भुजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भरडधान्य प्रक्रिया उद्योग विषयावर एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाला 100 पेक्षा अधिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ज्वारी, भगर, नागली, बाजरी यांसारख्या भरडधान्यांवर प्रक्रिया करून विविध मूल्यवर्धित खाद्यपदार्थ तयार करणे, त्यांचे पॅकेजिंग, ब्रँडिंग व विक्री व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक शेतकरी, युवक व विशेषतः महिलांना नवउद्योजक बनविण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या प्रशिक्षणानंतर इच्छुक बचत गट, शेतकरी गट व नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येणार असून, निवड झालेल्या गटांना परिपूर्ण व सखोल प्रशिक्षण घेण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी ग्रामपंचायत भुजगाव पुढाकार घेणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
प्रशिक्षणासाठी ऍग्रो झीचे महेश लोंढे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. CYDA संस्थेचे प्रकल्प समन्वयक राजेंद्र मोरे व मिलिंद पाटील यांनीही उपस्थितांना उपयुक्त माहिती दिली. कार्यक्रमास सरपंच अर्जुन पावरा, उपसरपंच कविता पावरा, ग्रामसेवक मोहन वळवी, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला तसेच ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे गावातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून “गावातील महिला आता उद्योजक” हे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने भुजगाव ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचे चित्र दिसून येत आहे.
अर्जुन पावरा लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत भुजगाव “या प्रशिक्षणामुळे गावातील महिलांना व युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळणार आहेत. ग्रामपंचायत भुजगाव महिलांना उद्योजक बनविण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करेल, “भरडधान्य प्रक्रिया उद्योगातून ग्रामीण भागात मोठ्या संधी आहेत. योग्य प्रशिक्षण घेतल्यास महिला व युवक यशस्वी उद्योजक होऊ शकतात.” “या प्रशिक्षणानंतर इच्छुक गटांना परिपूर्ण प्रशिक्षण देण्यात येणार असून महिलांना शाश्वत उपजीविकेच्या दिशेने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.”



