*लाखापुर माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांची वैज्ञानिक सृजनशक्तीचा विकास, अठरा वैज्ञानिक उपकरणांची भव्य मांडणी करीत विद्यार्थ्यांची वैज्ञानिक झेप, अठरा उपकरणांच्य
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाखापुर माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांची वैज्ञानिक सृजनशक्तीचा विकास, अठरा वैज्ञानिक उपकरणांची भव्य मांडणी करीत विद्यार्थ्यांची वैज्ञानिक झेप, अठरा उपकरणांच्य
*लाखापुर माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांची वैज्ञानिक सृजनशक्तीचा विकास, अठरा वैज्ञानिक उपकरणांची भव्य मांडणी करीत विद्यार्थ्यांची वैज्ञानिक झेप, अठरा उपकरणांच्या मांडणीतून विद्यालयात विज्ञानाचा जागर*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील लाखापुर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात साप्ताहिक कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य अशा विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या वैज्ञानिक कल्पकतेचे आणि ज्ञानाचे प्रभावी सादरीकरण केले.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी एकूण अठरा विविध वैज्ञानिक उपकरणांची मांडणी करून उपस्थितांना विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगितल्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रमुख उपकरणांमध्ये जलयुक्त जलचक्र, हायड्रोलिक जॅक, आधुनिक शेती यंत्र, रोटेशन मोशन, चुंबकीय कार, ऐतिहासिक नाणी, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, जैवविविधता, रोहित्र, चल यंत्र, सेंट्रिपिटल फोर्स यांसारख्या विषयांचा समावेश होता. प्रत्येक उपकरणामागील शास्त्रीय तत्त्वे, उपयोग आणि दैनंदिन जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांनी सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितले. त्यामुळे उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये विज्ञानाबाबत कुतूहल आणि उत्सुकता निर्माण झाली. या विज्ञान प्रदर्शनाचे मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. तसेच मुख्याध्यापक योगेश पाटील सह जिल्हा परिषदेमार्फत आलेल्या मुख्याध्यापक निरीक्षकांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.सादरीकरण, कल्पकता, उपयुक्तता आणि माहितीच्या आधारे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांना योग्य ते बक्षीस व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती आणि आत्मविश्वास वाढीस लागला, अशी भावना यावेळी उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली. अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षणाची संधी मिळून त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, असे मत शिक्षणप्रेमींनी व्यक्त केले.



