*राजमाता जिजाऊ राष्ट्रनिर्मात्या तर स्वामी विवेकानंद राष्ट्रचारित्र्य निर्माते"-प्रा.डॉ.एम.एस.उभाळे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजमाता जिजाऊ राष्ट्रनिर्मात्या तर स्वामी विवेकानंद राष्ट्रचारित्र्य निर्माते"-प्रा.डॉ.एम.एस.उभाळे*
*राजमाता जिजाऊ राष्ट्रनिर्मात्या तर स्वामी विवेकानंद राष्ट्रचारित्र्य निर्माते"-प्रा.डॉ.एम.एस.उभाळे*
दोंडाईचा(प्रतिनिधी):-"राजमाता जिजाऊ यांनी बालपणापासूनच शिवाजी महाराजांच्या मनात राष्ट्रनिर्माणाची चेतना जागृत केली आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती प्रत्यक्ष साकार केली. म्हणून राजमाता जिजाऊ राष्ट्रनिर्मात्या आहेत. तर स्वामी विवेकानंदांनी तरुणांना शक्ती प्राप्त करून चारित्र्य निर्मितीची प्रेरणा दिली. विवेकानंदांनी तरुणांमध्ये चारित्र्य निर्मितीची मूल्ये जागवली, म्हणून ते राष्ट्रचारित्र्य निर्माते आहेत" असे प्रा.डॉ. एम.एस.उभाळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. ते श्रीमंतराजे दौलतसिंहजी रावल बी.एड.महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत आयोजित, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती व युवक दिन कार्यक्रमात बोलत होते. सर्वप्रथम प्रा. डॉ.एम.एस.उभाळे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे, सहाय्यक सहसचिव आर. टी. गिरासे यांच्या हस्ते व सर्व प्राध्यापकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन केले. गणेश पारखे, दीपमाला भामरे, जयश्री ठाकूर यांनी समायोचित मनोगते सादर केली. तर प्रा. रविंद्र वळवी यांनी राजमाता जिजाऊ यांच्याशी संबंधित प्रसंगातून मनोगत सादर केले. तर प्रा. रविंद्र पाटील यांनी स्वामी विवेकानंदांनी तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची प्रेरणा निर्माण केली, असे सांगितले. रमेश पारखे यांनी आभार अभिव्यक्ती केली. सकाळ सत्रामध्ये स्वदेश संकल्प रनचे आयोजन करण्यात आले होते. यात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाच्या नियोजनाचे मार्गदर्शन प्राचार्य पी.डी.बोरसे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.एम.एस. उभाळे, प्रा.रवींद्र पाटील, प्रा. निशा ठाकूर, प्रा. सुनीता वळवी व प्रा. आर.एस.वळवी यांनी प्रयत्न केले. तर प्रशासकीय सेवक शंकर गिरासे, कृष्णा बागुल, अमर राजपूत व वीरपाल गिरासे सहकार्य केले.



