*लाखापुर माध्यमिक विद्यालयात साप्ताहिक कार्यक्रमाच्या शुभारंभ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाखापुर माध्यमिक विद्यालयात साप्ताहिक कार्यक्रमाच्या शुभारंभ*
*लाखापुर माध्यमिक विद्यालयात साप्ताहिक कार्यक्रमाच्या शुभारंभ*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील लाखापुर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात साप्ताहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण आठवडाभर विविध उपक्रम व स्पर्धांचे भरगच्च नियोजन करण्यात आले असून या साप्ताहिक कार्यक्रमाचा शुभारंभ विद्यालयाचे मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. साप्ताहिक कार्यक्रमांमध्ये रंगभरण रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा 100 मीटर धावणे निबंध स्पर्धा आनंद मेळावा विज्ञान प्रदर्शन विविध क्रीडा स्पर्धा इत्यादी आयोजन केले आहे.
साप्ताहिकाच्या पहिल्या दिवशी ग्रामस्वच्छता अभियान तसेच संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संगीत खुर्ची स्पर्धेत लहान गटात इयत्ता पाचवी ते सातवीतील मुले व मुली, तर मोठ्या गटात इयत्ता आठवी ते दहावीतील मुले व मुली असे स्वतंत्र गट करण्यात आले होते.
स्पर्धेत लहान व मोठ्या गटात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते घोषित करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमास पालकांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली असून त्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.



