*तिवरे गावच्या रहिवाशी व शिरवली शाळेतील शिक्षिका सौ. श्रध्दा संतोष दळवी यांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तिवरे गावच्या रहिवाशी व शिरवली शाळेतील शिक्षिका सौ. श्रध्दा संतोष दळवी यांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*
*तिवरे गावच्या रहिवाशी व शिरवली शाळेतील शिक्षिका सौ. श्रध्दा संतोष दळवी यांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील तिवरे दळवी वाडीतील रहिवासी व जि.प.पू प्राथमिक आदर्श शाळा शिरवली ता.लांजा शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सौ.श्रध्दा संतोष दळवी यांना राजापूर - लांजा नागरिक संघ. मुंबई या संस्थेचा साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे
सौ.दळवी या 1 ऑगस्ट 2014 पासून जि.प. पू प्राथमिक आदर्श शाळा येथे कार्यरत आहेत याआधी त्या आरगांव नं 2 शाळेत 13 वर्षे व विलवडे नं 1 मध्ये अध्यापन केले आहे. सौ. श्रध्दा संतोष दळवी यांचा शाळेतील विविध उपक्रमात सक्रिय सहभाग असून त्यांनी कार्यकाळात अनेक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी घडवले नासा इस्त्रो भेटीसाठी 4 विद्यार्थ्यांची निवड तसेच मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा स्पर्धेत शिरवली शाळेला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. त्यांनी राबविलेल्या परसबाग उपक्रमाला तालुक्यातून सलग 3 वर्षे प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यांची जि.प. मार्फत अभ्यास दौऱ्यासाठीही निवड झाली आहे सौ. दळवी यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी क्रिडा स्पर्धेत जिल्हास्तरावर मजल मारली आहे यासर्व शैक्षणिक उपक्रमांची दखल घेऊन राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी पत्राद्वारे कळविले आहे पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दि 30 जानेवारी ते रविवार 1 फेब्रुवारी या कालावधीत लांजा तालुक्यातील रिंगणे येथे होणाऱ्या 11 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात दि. 1 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ श्रध्दा संतोष दळवी यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सहकारी शिक्षक, शिरवली शाळा तसेच लांजा राजापूर तालुक्यातूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



