*राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन*
*राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन*
मुंबई(प्रतिनिधी):-बुध्द, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवाच्या क्रांतिकारी विचाराचा वसा जोपासत गेली 20 वर्षे सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक, कला, क्रीडा, जल, व पर्यावरण क्षेत्रात अविरतपणे कार्य करणाऱ्या विश्व समता कलामंच लोवले, ता. संगमेश्वर जि.रत्नागिरी (रजि.) व डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत रजि. दोन्ही संस्थेच्या वतीने सन 2026 मध्ये दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कारा साठी प्रस्ताव मागविण्यात येत असून. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक, कला, क्रीडा, जल, पर्यावरण व निर्भीड पत्रकार जे तळमळीने समाजासाठी आपले योगदान देत आहेत, व ज्यांचे प्रेरणादायी लौकिक कार्य समाज हिताचे आहे. अशा व्यक्ती व सामाजिक संस्था या पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव पाठवू शकतात. यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, सरपंच, समाजसेवक, साहित्यिक, कला, क्रीडा, पत्रकार, जल, पर्यावरण व विविध कलागुण संपन्न व्यक्ती आपले प्रस्ताव पाठवू शकतात. सदर राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कार वितरणाचे 20 वे वर्षे असून आज पर्यंत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 2000 हून अनेक व्यक्तीनी या विश्व समता पुरस्काराचा बहुमान पटकविला आहे. इच्छुक व्यक्तींनी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविताना पुर्ण नाव जन्म दिनांक, शैक्षणिक पात्रता, पुर्ण पत्ता व संपर्क क्रमांक आवड व छंद,
1 रंगीत फोटो, यापूर्वी मिळालेले पुरस्कार, आपण करत असलेल्या क्षेत्रातील कार्याचा अहवाल असा परिपूर्ण प्रस्ताव 20 जानेवारी 2026 पर्यंत ८९९९४९४१८३,९७६७१०८६७१ या व्हाट्सअप नंबरवर पाठवावेत पुरस्काराचे स्वरूप आकर्षक फ्रेम मध्ये भरलेले पुरस्कार मानपत्र, विश्व समता पुरस्कार गौरव पट्टा, आकर्षक सन्मानचिन्ह असे असून पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते 15 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे असे संस्थापक अध्यक्ष मनोज जे. जाधव यांनी सांगितले आहे.



