*इमिनन्स पॉवर पब्लिक स्कूलचा क्रीडा दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*इमिनन्स पॉवर पब्लिक स्कूलचा क्रीडा दिन उत्साहात साजरा*
*इमिनन्स पॉवर पब्लिक स्कूलचा क्रीडा दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-इमिनन्स पॉवर पब्लिक स्कूलचा क्रीडा दिन पोलीस ग्राउंड येथे मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस विभागाने दिलेल्या सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापनाने आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेच्या संचालिका सौ. संयोगिता माळी यांनी पोलीस अधिकारी पवार यांचे स्वागत केले. त्यांच्या हस्ते क्रीडा मशाल प्रज्वलित करून क्रीडा महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. नर्सरी ते इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी धावण्याच्या शर्यतींमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, ऊर्जा आणि क्रीडावृत्तीचे दर्शन घडले. सर्व बालकांनी खेळांचा मनमुराद आनंद घेत पूर्ण उत्साहाने सहभाग नोंदवला.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक व कौशल्याधारित खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कप बॅलन्स गेम, कप बॉल बॅलन्सिंग, बॉल इन द बास्केट, रिंग जंप, पुस्तक संतुलन, प्लास्टिक ग्लास फुंकण्याची शर्यत, टी कप फुंकण्याची शर्यत, अडथळा शर्यत (रेडी फॉर स्कूल) तसेच ‘चॉकलेट शोधा’ या खेळांचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे संचालक मधुकर माळी, प्राचार्य सौ. शितल घुगे, कौन्सिलर सौ. आकांक्षा तिवारी, सौ. धनश्री पाटील, कुमारी सानिया मिर्झा, सौ. अंकिता चौधरी, सौ. मनीषा गावित, सौ. शुभांगी गव्हाणे, जयश्री आव्हाड, कु. मानसी पवार, कु. निकिता पवार, कु. पूजा पाटील, दीपाली, दानिश आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
इमिनन्स पॉवर पब्लिक स्कूलचा पालक वर्ग तसेच पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



